24 April 2025 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेंदाता कंपनी शेअर्समध्ये तुफान तेजीचे संकेत, जोरदार खरेदी सुरु, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL TTML Share Price | टाटा ग्रुपचा पेनी स्टॉक पुन्हा तेजीत; 5 वर्षात 2,028% परतावा दिला, टार्गेट अपडेट जाणून घ्या - NSE: TTML Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये तुफान तेजीचे संकेत, सुस्तावलेला स्टॉक पैसा वसूल करणार - NSE: TATATECH Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये 3000 रुपये जमा केल्यास 5 वर्षांत किती मिळतील? अशी ठरवा बचत रक्कम
x

Campus Activewear Share Price | भारतातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स फुटवेअर कंपनीचे शेअर्स स्वस्त झाले, गुंतवणूक करावी? डिटेल वाचा

Campus Activewear Share Price

Campus Activewear Share Price | ‘कॅम्पस ऍक्टिव्हवेअर लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची पडझड पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.72 टक्के घसरणीसह 338.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘कॅम्पस अॅक्टिव्हवेअर’ कंपनीचे शेअर्स पडण्याचे मुख्य कारण म्हणजे एक ब्लॉक डील आहे. अमेरिकन अल्टरनेटिव्ह अॅसेट मॅनेजमेंट फर्म TPG ग्लोबलने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्लॉक डीलद्वारे ‘कॅम्पस ऍक्टिव्हवेअर लिमिटेड’ कंपनीमधील संपूर्ण 7.6 टक्के भाग भांडवल विकून एक्झिट करण्याची घोषणा केली आहे. मालमत्ता व्यवस्थापन फर्म कॅम्पस ऍक्टिव्हवेअर कंपनीचे 2,32,07,692 शेअर्स खुल्या बाजारात 345 रुपये प्रति शेअर या फ्लोअर प्राइसवर विकणार आहे. (Campus Activewear Limited)

सप्टेंबर 2017 मध्ये TPG ग्लोबल ग्रोथ इक्विटी प्लॅटफॉर्म ‘TPG ग्रोथ’ आणि QRG हॅवेल्स ग्रुपच्या प्रवर्तकांनी मिळून ‘कॅम्पस ऍक्टिव्हवेअर’ कंपनीचे 20 टक्के भागभांडवल खरेदी करून मोठी गुंतवणूक केली होती. त्यावेळी या कंपनीचे बाजार मूल्य 1,500 कोटी रुपये होते..यानंतर मागील वर्षी कॅम्पस ऍक्टिव्हवेअर कंपनीचा आयपीओ बाजारात लाँच झाला. आणि कंपनीचे शेअर्स मे 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 41.49 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत कॅम्पस ऍक्टिव्हवेअर कंपनीने जाहीर केलेल्या तिमाही निकालांनुसार कंपनीने 48.31 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 54.72 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीला ऑपरेशन्समधून मिळणारा वार्षिक महसूल 7.4 टक्के वाढीसह 465.62 कोटी रुपयेवर पोहचला होता. ‘कॅम्पस ऍक्टिव्हवेअर’ ही भारतातील सर्वात मोठी स्पोर्ट्स आणि ऍथलीट फुटवेअर ब्रँड कंपनी म्हणून ओळखली जाते. एका प्रसिद्ध अहवालानुसार बाजार मूल्य आणि सेल्स व्हॉल्यूमच्या दृष्टीने 2021 मध्ये कॅम्पस ऍक्टिव्हवेअर भारतातील सर्वात मोठा स्पोर्ट्स आणि ऍथलीट ब्रँड म्हणून प्रसिद्ध झाला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Campus Activewear Share Price BSE 543523 on 25 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Campus Activewear Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या