23 November 2024 10:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News
x

भाजप कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजीमुळे एक महिला प्रवासी पडली, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून चोप

Urmila Matondkar, Congress

मुंबई : एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या महिला उमेदवारांना अश्लील टिप्पणीला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजीचा सामना करावा लागला आहे. यावर मातोंडकर यांनी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस संरक्षणाचीही मागणी केली आहे. या हुल्लडबाजींमध्ये एक महिला प्रवासी पडल्याने जखमी झाली आहे. तर या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे.

बोरिवलीमध्ये सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर या प्रचार करत होत्या. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. तसेच अश्लील नाच करून दाखवत ‘मोदी मोदी’च्या घोषणा दिल्याचा आरोप उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे. यामुळे तेथील काँग्रेस कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

उर्मिला मातोंडकर या रेल्वे स्थानक आवारात प्रचार करत होत्या. यावेळी अचानक ८ ते १० जण त्याठिकाणी आले. त्यांनी उर्मिला यांच्यासमोरच वेडावाकडा नाच केला. तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत एक पॅसेंजर महिला खाली पडून किरकोळ जखमी झाली. यानंतर बोरिवली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x