12 December 2024 7:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Asian Energy Share Price | झटपट पैसे वाढवणारा स्टॉक! अल्पावधीत गुंतवणूकदारांना मिळाला 81 टक्के परतावा

Asian Energy Share Price

Asian Energy Share Price | ‘एशियन एनर्जी’ कंपनीच्या शेअरने ‘इंडिया रेटिंग्स एजन्सी’ कडून डाउनग्रेड रेटिंग दिल्यानंतर ही गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. अवघ्या एका महिन्यात ‘एशियन एनर्जी’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 81.61 टक्के परतावा कमावून दिला आहे. एशियन एनर्जी कंपनीच्या शेअरने एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे जवळजवळ दुप्पट केले आहे. ‘एशियन एनर्जी’ कंपनीच्या प्रवर्तकाने कंपनीमध्ये आपला गुंतवणूक वाटा वाढवला आहे. मात्र शुक्रवार दिनाक 24 मार्च 2023 रोजी शेअर बाजारातील नफावसुलीमुळे ‘एशियन एनर्जी’ कंपनीचे शेअर्स 3.65 टक्के घसरणीसह 101.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Asian Energy Limited)

स्टॉकमधील तेजीचे कारण :
‘एशियन एनर्जी’ कंपनीने आपल्या फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, त्यांची होल्डिंग कंपनी ‘Oilmax Energy’ ला 20 वर्षांसाठी खाण लीजवर मिळाली आहे. आणि ही लीज 1 एप्रिल 2023 पासून सुरू होणार आहे. डीएसएफ ब्लॉकमधून कच्चे तेल आणि वायू काढण्यासाठी गुजरात सरकारने ‘एशियन एनर्जी’ कंपनीला खाण लीजवर दिली आहे. व्यतिरिक्त ‘एशियन एनर्जी’ कंपनीने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, त्यांना यूएईच्या स्वेतह एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर FZE कडून 165 कोटी रुपये मूल्याचा प्रोजेक्ट मिळाला आहे, ज्या अंतर्गत कंपनी येथे उत्पादन, स्टोरेज आणि ऑफलोडिंग सिस्टमचे व्यवस्थापन आणि देखरेख काम करणार आहे. या FPSO करारा अंतर्गत कंपनी पुद्दुचेरी किनाऱ्यावरून तेल आणि वायू काढण्याचे काम करणार आहे. या कराराची मुदत पाच वर्ष असेल. आणि ज्या दिवसापासून स्वेथ व्हेनेशिया हायड्रोकार्बन्स पदार्थ ताब्यात घेण्यास सुरुवात करेल त्या दिवसापासून कराराची मुदत सुरू होईल.

इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च फर्मने मागील महिन्यात एशियन एनर्जी कंपनीचे दीर्घकालीन रेटिंग IND BBB- वरून कमी करून IND BBB ठेवले होते. तथापि एप्रिल-सप्टेंबर 2022 मध्ये कंपनीच्या एकत्रित महसूल आणि नफ्यात घट झाल्यामुळे रेटिंग एजन्सीने डाऊनग्रेड रेटिंग दिली होती. सप्टेंबर 2022 ला संपलेल्या सहामाहीत कंपनीने 128.60 कोटी रुपये एकत्रित महसूल संकलित केला होता, जो डिसेंबर तिमाहीत घसरून 52.30 कोटी रुपयांवर आला. दक्षिण त्रिपुरा आणि बारामुरा प्रकल्पांना स्थानिक विरोध आणि भूकंपीय डेटा संपादन सेवांसाठी नवीन ऑर्डर न मिळाल्यामुळे कंपनीचा महसूल इतका घसरला आहे. इंडिया रेटिंग्ज फर्मनुसार कंपनीच्या कामकाजात घट झाल्यामुळे त्याचा परिचालन रोख प्रवाह चालू आर्थिक वर्षात घसरू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Asian Energy Share Price BSE 530355 NSE ASIANENE on 25 March 2023.

हॅशटॅग्स

Asian Energy Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x