22 November 2024 12:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Balkrishna Industries Share Price | पैसाच पैसा! या शेअरने गुंतवणुकदारांना 41,664% परतावा देत करोडपती बनवलं, स्टॉक बद्दल जाणून घ्या

Balkrishna Industries Share Price

Balkrishna Industries Share Price| शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात किंचित धोका असतो, जर तुम्ही चांगल्या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही सहज करोडपती होऊ शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘बालकृष्ण इंडस्ट्रीज’. (Balkrishna Industries Limited)

‘बालकृष्ण इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने मागील 28 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. 14 जुलै 1995 रोजी बीएसई इंडेक्सवर या कंपनीचे शेअर्स 4.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.21 टक्के वाढीसह 1,960.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कालावधीत ‘बालकृष्ण इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 41,664.58 टक्के परतावा कमावून दिला आहे.

जर तुम्ही 1995 साली ‘बालकृष्ण इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरमध्ये 24000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1 कोटींहून अधिक झाले असते. बालकृष्ण इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा मिळवून दिला आहे. 22 मार्च 2013 रोजी बीएसई इंडेक्सवर ‘बालकृष्ण इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 132.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कालावधीत या कंपनीच्या शेअरने लोकांना 1360.6 टक्के परतावा कमावून दिला आहे. इतक्या परताव्यासह, गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 14 लाखांपेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. मागील 5 दिवसात ‘बालकृष्ण इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स सुमारे 1.61 टक्के कमजोर झाले आहेत. तर मागील 1 महिन्यात या कंपनीचे शेअर 4.44 टक्के कमजोर झाले आहेत. मागील 6 महिन्यांत या स्टॉकने लोकांना 6.29 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर 2023 या वर्षात हा स्टॉक 9.18 टक्के घसरला आहे. मागील पाच 5 वर्षात शेअरची किंमत 60.23 टक्के वाढली आहे.

‘बालकृष्ण इंडस्ट्रीज’ कंपनीचे सध्याचे एकूण बाजार भांडवल 37,448.44 कोटी रुपये आहे. ‘बालकृष्ण इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2451 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1801 रुपये होती. मुंबई स्थित बालकृष्ण इंडस्ट्रीज ही कंपनी एक भारतीय बहुराष्ट्रीय टायर उत्पादन करणारी कंपनी आहे. बाळकृष्ण इंडस्ट्रीज कंपनी औरंगाबाद, भिवडी, चोपंकी, डोंबिवली आणि भुज या ठिकाणी स्थित असलेल्या पाच कारखान्यांमधून उत्पादन कार्य करते. तर कंपनी खाणकाम, अर्थमूव्हिंग, कृषी आणि फलोत्पादन यासारख्या विशेषज्ञ विभागांमध्ये वापरल्या जाणार्‍या ऑफ-हाईवे टायर्सचे देखील उत्पादन करण्याचे काम करते. 2013 मध्ये जगातील सर्वात मोठ्या टायर उत्पादक कंपन्यांमध्ये ‘बालकृष्ण इंडस्ट्रीज’ 41 व्या क्रमांकावर होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Balkrishna Industries Share Price on 28 March 2023.

हॅशटॅग्स

#Balkrishna Industries Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x