24 November 2024 11:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Sun Retail Share Price | हा पेनी शेअर फक्त 0.67 पैशाचा, रोज 20 टक्के वाढतोय, खिशातील चिल्लरने खरेदी करणार?

Sun Retail Share Price

Sun Retail Share Price | शेअर बाजारात सुरू असेलल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मायक्रो कॅप कंपनी ‘सन रिटेल लिमिटेड’ चे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 19 टक्के वाढीसह 0.56 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.64 टक्के वाढीसह 0.67 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 14 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.41 पैसे या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ‘सन रिटेल लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1.27 रुपये होती. (Sun Retail Limited)

संचालक मंडळाची बैठक झाली :
24 मार्च 2023 रोजी ‘सन रिटेल लिमिटेड’ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत कंपनीने निधी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कंपनी लवकरच राइट इश्यूच्या माध्यमातून भांडवल उभारणी करणार आहे. राइट्स इश्यू ही कॉर्पोरेट कृती असून त्यात कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना सवलतीत शेअर्स ऑफर करते.

गुंतवणुकीवर परतावा :
‘सन रिटेल लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने अवघ्या पाच दिवसात आपल्या गुंतवणुकदारांना 48.89 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 52.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 11.67 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 44.63 टक्के नकारात्मक परतावा कमावून दिला आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘सन रिटेल लिमिटेड’ कंपनी मुख्यतः रिफाइंड / फिल्टर्ड खाद्यतेलांच्या व्यापारात गुंतलेली आहे. कंपनीच्या प्रमुख उत्पादनांमध्ये शेंगदाणा तेल आणि सूर्यफूल तेल सामील आहेत. ही कंपनी पामोलिन तेल आणि सोयाबीन तेलाचा घाऊक व्यापार देखील करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sun Retail Share Price on 29 March 2023.

हॅशटॅग्स

Sun Retail Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x