Nykaa Share Price | अत्यंत स्वस्त झालेला नायका शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राईस? डिटेल्स पहा
Nykaa Share Price | ‘नायका’ ची मूळ कंपनी FSN ई-कॉमर्स व्हेंचर्सच्या शेअर्समध्ये अजूनही विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंट्रा-डे मध्ये बीएसई इंडेक्सवर हा स्टॉक 2 टक्के कमजोरीसह 125.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या ब्युटी ई-रिटेलर कंपनीचा स्टॉक सलग आठव्या दिवशी लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. या कालावधीत शेअरची किंमत 11 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. 23 जानेवारी 2023 रोजी ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 120.75 रुपये या सर्वकालीन नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. काल बुधवार दिनाक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के घसरणीसह 127.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (FSN E-Commerce Ventures Limited)
‘नायका’ कंपनीचा आयपीओ 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. नायका कंपनी मुख्यतः सौंदर्य प्रसाधन, पर्सनल केअर, आणि फॅशन ब्रँड क्षेत्रात भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन मार्केटप्लेस मानली जाते. या कंपनीचे शेअर्स नोव्हेंबर 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. IPO मध्ये शेअरची किंमत प्रति शेअर 1,125 रुपये निश्चित करण्यात आली होती. ‘नायका’ कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात 83 टक्के प्रीमियम किमतीवर 2054 रुपयेवर सूचीबद्ध करण्यात आले होते.
कंपनीमध्ये व्यवस्थापन बदल :
फाल्गुनी नायर यांच्या नेतृत्वाखालील FSN ई-कॉमर्स व्हेंचर्सच्या व्यवस्थापन मंडळात अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. कंपनीतील अनेक बड्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. नुकतेच कंपनीच्या पाच बड्या अधिकाऱ्यांनी देखील आपल्या पदाचा त्याग केला आहे. मनोज गांधी-चीफ कमर्शियल ऑपरेशन्स ऑफिसर, गोपाल अस्थाना- मुख्य व्यवसाय अधिकारी, फॅशन विभाग-विकास गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी-घाऊक व्यवसाय, यांचे नाव सामील आहेत. याशिवाय नायका फॅशन डिव्हिजनच्या मालकीच्या ब्रँड व्यवसायाच्या उपाध्यक्षा शुची पंड्या, फॅशन युनिटमधील फायनान्स ललित प्रुथी, यांनी देखील आपल्या पदाचा त्याग केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, राजीनामा दिलेल्यांपैकी काही मध्यम स्तरीय कर्मचारी असून ते वार्षिक पॅकेज आणि नवीन संधीच्या शोधत कंपनी सोडत आहेत.
ब्रोकरेज फर्मचे मत :
जेफरीज फर्मने शेअर बाजारात उच्च अस्थिरता असताना ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 200 रुपयांवर जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 45 टक्क्यांनी अधिक आहे. FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स कंपनीने एका वर्षापूर्वी 29 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता, जो या तिमाहीत 71 टक्के घसरणीसह 8.5 कोटी रुपयेवर आला आहे. तथापि ‘नायका’ कंपनीच्या ऑपरेशन्समधील महसूल वार्षिक 33 टक्क्यांच्या वाढीसह 1,463 कोटी रुपयेवर गेला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Nykaa Share Price on 30 March 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News