24 November 2024 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

TTML Share Price | टीटीएमएल शेअरमध्ये पुन्हा तेजी, स्टॉक मध्ये अचानक वाढ पाहून गुंतवणुकदार हैराण, नेमकं कारण काय?

TTML Share Price

TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी 4.97 टक्के वाढीसह 52.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स काल अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सनी दिवसाच्या व्यवहारात 49.80 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती. टीटीएमएल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 210 रुपये होती. (Tata Teleservices Maharashtra Ltd)

3 वर्षात 1 लाखावर 28 लाख परतावा :
‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर 1.83 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे BSE इंडेक्सवर 52.85 रुपये किमतीवर पोहचले आहेत. जर तुम्ही टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये 3 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 28.87 लाख रुपये झाले असते. टीटीएमएल कंपनीचे बाजार भांडवल 10331 कोटी रुपये आहे.

2 वर्षात 2705 टक्के परतावा :
मागील 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2705 टक्के परतावा कमावून दिला होता. 1 एप्रिल 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर 14.14 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 29 मार्च 2023 रोजी हा स्टॉक 52.85 रुपये किमतीवर आला आहे. टीटीएमएल कंपनीमध्ये प्रवर्तक 74.36 टक्के भाग भांडवल धारण करत आहेत.

स्टॉकमध्ये मजबूत घसरण :
एका वर्षात ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 66.72 टक्के कमजोर झाले आहेत. ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मागील सहा महिन्यात 48.89 टक्के कमजोर झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 5.71 टक्के घसरले आहेत. तर YTD आधारे हा स्टॉक 42.43 टक्के कमजोर झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price on 30 March 2023.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x