#आयपीएल२०१९ - पंजाबचा राजस्थानवर १२ धावांनी विजय

मोहाली : मोहालीच्या मैदानावर अटीतटीच्या लढतीत अखेर पंजाबने राजस्थानवर १२ धावांनी मात केली. राहुलचे अर्धशतक आणि मिलरची फटकेबाज खेळीच्या जोरावर पंजाबने राजस्थानपुढे १८३ धावांचे आव्हान ठेवले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ १७० धावांपर्यंतच मजल मारू शकला. स्टुअर्ट बिन्नीने शेवटच्या टप्प्यात ११ चेंडूत ३१ धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले.
आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील राजस्थान-पंजाब लढतीत प्रथम फलंदाजी करणार्या पंजाबने २० षटकांत १८२ धावांची मजल मारली. सलामीवीर राहुल ५२ आणि डेव्हीड मिलर ४० धावा यांच्या दमदार फलंदाजीमुळे पंजाबला १८० धावांचा पल्ला पार करता आला. राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम पंजाबला फलंदाजी दिली. सुरुवातीला त्याचा निर्णय फायदेशीर ठरला. धोकादायक गेलला आर्चरने ३० धावांवर बाद करून राजस्थानला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर गेलची जागा घेणारा मयांक अगरवालदेखील फार काळ टिकला नाही. त्याला सोढीने २६ धावांवर बाद करून राजस्थानला दुसरे यश मिळवून दिले. पण त्यानंतर राहुल-मिलर जोडी जमली. यांनी तिसर्या विकेटसाठी ८५ धावांची भाागिदारी करून पंजाबचा डाव सावरला. अखेर राहुलला उडानकटने ५२ धावांवर बाद करून ही जोडी फोडली.
त्यानंतर आलेला मनदीप सिंग आणि यष्टीरक्षक पुरन झटपट माघारी परतला. कर्णधार अश्विनने मिलरला बर्यापैकी साथ दिली. मिलरला धवल कुलकर्णीने ४० धावांवर बाद करून त्याला अर्धशती खेळी करू दिली नाही. मनदीप सिंगला आर्चरने भोपळादेखील फोडू दिला नाही. राजस्थानतर्फे आर्चरने सुरेख मारा करताना अवघ्या १५ धावांत ३ बळी टिपले. त्याने गेल, पुरण आणि मनदीप सिंगचे बळी मिळविले. तर कुलकर्णी उडानकट आणि सोढीला प्रत्येकी एक बळी मिळाला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK