24 November 2024 9:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Sintex industries Share Price | 'रिलायन्स इंडस्ट्रीज'ने ही कंपनी खरेदी केली, आता या कंपनीचे शेअर्स वाढणार? डिटेल्स पहा

Sintex industries Share Price

Sintex industries Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती ‘मुकेश अंबानी’ यांच्या मालकीच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीने अहमदाबाद स्थित सूत आणि फॅब्रिक निर्माता ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे अधिग्रहण पूर्ण केल्याची माहिती दिली आहे. ‘मुकेश अंबानी’ यांच्या रिलायन्स कंपनीने 1500 कोटींची गुंतवणूक करून ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ या दिवाळखोर कंपनीला विकत घेतले आहे. ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ ही कंपनी 90 वर्ष जुनी असून ही कंपनी भारतात काळ्या पाण्याच्या टाकीची निर्मिती करण्यासाठी ओळखली जाते. ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ कंपनीची स्थापना 1931 साली झाली होती. 10 फेब्रुवारी 2023 पासून ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग बंद करण्यात आली आहे. नुकताच NCLT ने ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ आणि ‘अॅसेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्राइझ’ यांच्या संयुक्त बोलीला मंजुरी देऊन कंपनीच्या अधिग्रहणला मान्यता दिली होती. (Sintex industries Limited)

कंपनीचे स्पष्टीकरण :
‘सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, या डील अंतर्गत, कंपनीने ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ ला 600 कोटी रुपये किमतीचे शेअर्स आणि 900 कोटी रुपये किमतीचे पूर्णपणे परिवर्तनीय डिबेंचर जारी केले आहेत. कंपनीचे संपादन पूर्ण झाल्यानंतर ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कडे ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ चे 70 टक्के भाग भांडवल आले आहेत. सिंटेक्स कंपनीचे व्यवस्थापन ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ आणि ‘अॅसेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्राइझ’ द्वारे संयुक्त उपक्रमांतर्गत चालवले जाणार आहे. या संपादनामुळे ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीला त्याचा टेक्सटाईल व्यवसाय वाढवण्यास खूप मोठी मदत होणार आहे.

कंपनीची दिवाळखोरी प्रक्रिया :
‘सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीमध्ये RIL ची गुंतवणूक ही दिवाळखोरी प्रक्रिये अंतर्गत करण्यात आली आहे. सिंटेक्स कंपनीवर 7500 कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे. ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ कंपनी कर्ज फेडण्यास सक्षम नसल्याने त्या विरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया गेल्या वर्षी एप्रिल 2022 मध्ये सुरू झाली होती. या कंपनीच्या लिलावात बोली लावणाऱ्यांमध्ये वेलस्पन ग्रुपची ‘फर्म इझीगो टेक्सटाइल’, ‘जीएचसीएल’ आणि ‘हिमसिंका व्हेंचर्स’ हे देखील सामील होते. या कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग बंद करण्यात आली असून, हा स्टॉक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुन्हा शेअर बाजारात सूचीबद्ध होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sintex industries Share Price on 31 March 2023.

हॅशटॅग्स

#Sintex Industries Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x