22 November 2024 7:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Viral Video | अबब! जगातील भयंकर आणि विशाल आकाराचा साप कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ पाहूनच धडकी भरेल

Viral Video

Viral Video | हॉलिवूड चित्रपटांमधील अॅनाकोंडा हा सापाचा चित्रपट तुमच्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने महाकाय विशाल साप दाखवले आहेत ते खरोखर प्रत्यक्षात आहेत का? असा प्रश्न तुमच्या मनात अनेकदा आला  असेल. सध्या सोशल मीडियावर एका विशाल अजगराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना घाम फुटलाय. (Trending Video on social Media)

भारतीय वन सेवेतील अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर या अजगराचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये एक भलामोठा अजगर  सरपटताना दिसत आहे. आजवर तुम्ही इतका मोठा आणि विशाल अजगर कधीच पाहिला नसेल. हा व्हिडिओ पोस्ट करत सुशांत यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, पृथ्वीवरील सर्वात मोठा आणि बलाढ्य असा अजगर.

हा अजगर पृथवीवरील सर्वाधिक लांब अजगर आहे. आपले शिकार पकडण्यासाठी तो सरपटत पुढे जाताना दिसत आहे. पुढे या अजगराची माहिती देत त्यांनी कॅप्शमध्ये लिहिले आहे की, हे अजगर अगदी एका झटक्यात एखाद्या व्यक्तीचा जीव घेऊ शकतात. त्यांच्यामध्ये १४ PSI इतकी ताकत असते. आपल्या ताकतीच्या जोरावर ते एखाद्या माणसाला सहज गुदमरून मारू शकतात.

हे साप इतके बलाढ्या आणि मोठे असले तरी ते बिनविषारी असतात. आपल्या भक्षासाठी त्यांना विष असणे गरजेचे नसते. ते वेटोळे घालत शिकार करतात. अशा प्रकारचे साप हे पाण्यापासून थोडे दूर आढळतात. त्यांची प्रजाती आता काही प्रमाणावर कमी होत चालली आहे. अशा सापांच्या प्रजाती ठरावीक लहान बेटांवर राहतात.

सापाच्या कातडीपासून औषध
सुशांत यांनी या सापाविषयी सांगताना पुढे लिहिले आहे की, या सापांची प्रजाती आता कमी होत चालली आहे. व्यक्ती त्यांची शिकार करतात. तसेच त्यांच्या कातडीचा वापर विविध प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो. या विशाल सापाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत ४४ हजारांहून अधिक व्यक्तींनी हा व्हिडिओ पाहिलाय. सापाच्या या प्रजातीविषयी तुम्हाला अधिक माहिती असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of biggest python trending on social media check details on 02 April 2023.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x