22 November 2024 4:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Multibagger Stocks | 1 वर्षात सर्वाधिक परतावा देणाऱ्या 30 मल्टीबॅगर्स शेअरची लिस्ट सेव्ह करा, हे स्टॉक कमाई करून देतात

Multibagger Stocks

Multibagger Stocks| 2022-23 हे आर्थिक वर्ष स्मॉलकॅप सेगमेंटसाठी फार निराशाजनक गेले, मात्र अनेक मल्टीबॅगर्स स्टॉक देखील याच विभागातून आले आहेत. स्मॉलकॅप सेगमेंटमध्ये असे 30 स्टॉक्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना 100 ते 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षात सेन्सेक्स निर्देशांक फक्त अर्धा टक्का वाढला आहे. तर निफ्टीमध्ये अर्धा टक्का घसरण पहायला मिळाली आहे. जागतिक बाजारपेठेत कमालीची अस्थिरता निर्माण झाली होती, त्यामागे आर्थिक मंदीची भीती, वाढते व्याजदर, महागाईचा उच्च स्तर आणि रशिया-युक्रेन तणाव, हे सर्व नकारात्मक घटक कारणीभूत होते. आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत 2020-21 आणि 2021-22 मध्ये भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त कामगिरी केली होती. यादरम्यान निफ्टी आणि सेन्सेक्सने दुहेरी अंकी परतावा दिला होता. आज आपण अशा काही मल्टीबॅगर्सची लिस्ट पाहणार आहोत.

सर्वाधिक परतावा देणारे टॉप 5 लार्जकॅप स्टॉक :
* ITC : 53 टक्के
* M&M : 43 टक्के
* ब्रिटानिया इंडस्ट्रीज : 35 टक्के
* NTPC : 31 टक्के
* HUL : 23 टक्के

निफ्टी-500 मधील सर्वाधिक परतावा देणारे टॉप शेअर्स :
* माझगाव डॉक : 166 टक्के
* फिनोलेक्स केबल्स : 118 टक्के
* करूर व्यास बँक : 118 टक्के
* UCO बँक : 107 टक्के
* महिंद्रा CIE : 104 टक्के

सर्वाधिक परतावा देणारे टॉप 5 मिडकॅप स्टॉक :
* वरुण बेव्हरेजेस : 124 टक्के
* हिंदुस्तान एरोनॉटिक्स : 98 टक्के
* युनियन बँक ऑफ इंडिया : 78 टक्के
* TVS मोटर: 76 टक्के
* बँक ऑफ इंडिया : 68 टक्के

सर्वाधिक परतावा देणारे टॉप 5 स्मॉलकॅप्स स्टॉक :
* सोमा टेक्सटाइल्स : 408 टक्के
* अपार इंडस्ट्रीज : 282 टक्के
* किर्लोस्कर ऑइल : 202 टक्के
* स्टर्लिंग टूल्स : 200 टक्के
* पॉवर मेकॅनिक प्रोजेक्ट : 196 टक्के

स्मॉलकॅपमध्ये 100% किंवा त्याहून अधिक परतावा देणारे स्टॉक :
* इलेकॉन इंजिनीअरिंग,
* डब्ल्यूपीआयएल,
* कामधेनू,
* बीएलएस इंटरनॅशनल,
* चॉईस इंटरनॅशनल,
* मॅरेथॉन नेक्स्टजेन,
* युनिव्हर्सल केबल्स,
* टिटागढ वॅगन्स,
* कर्नाटक बँक,
* सनफ्लॅग आयर्न,
* उज्जीवन फायनान्स सर्व्हिसेस,
* टीडी पॉवर सिस्टम,
* फिनोलेक्स केबल्स,
* सफारी इंडस्ट्रीज,
* लॉयड मेटल्स,
* रामा स्टेबल्स,
* Ricoh Auto Industries,
* ION Exchange,
* Mahindra CIE.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8 लाख कोटींची घट झाली आहे. 31 मार्च 2022 पर्यंत, बीएसई इंडेक्सवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 2,64,06,501.38 रुपये होते, जे 31 मार्च 2023 रोजी पर्यंत 2,58,28,611 कोटीवर आले आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना मागील आर्थिक वर्षात सुमारे 8 लाख कोटीं रुपये गमवावे लागले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks has given huge Return to shareholders in last financial year details on 03 April 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x