22 November 2024 7:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Tips Industries Share Price | दिग्गज म्युजिक कंपनीचे शेअर्स दहापट स्वस्त होणार, या तारखे पूर्वी शेअरची खरेदी करा, फायदा होईल

Tips Industries Share Price

Tips Industries Share Price | ‘टिप्स इंडस्ट्रीज’ या चित्रपट निर्मिती क्षेत्राशी संबंधित कंपनीचे शेअर्स आणखी स्वस्त होणार आहे, कारण कंपनीने स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. ‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. ‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनीने स्टॉक स्लिटची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. स्टॉक स्प्लिट ची घोषणा करताच कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली. 3 एप्रिल 2023 रोजी ‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 7.65 टक्के वाढीसह 1,572.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Tips Industries Limited)

टिप्स इंडस्ट्रीज स्टॉक स्प्लिट :
‘टिप्स इंडस्ट्रीज’ कपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 10 भागांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 1 रुपये होईल. या स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट म्हणून कंपनीने 21 एप्रिल 2023 हा दिवस निश्चित केला आहे. ज्या लोकांचे नाव 21 एप्रिल 2023 पर्यंत कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये सामील राहील त्यांना कंपनी स्टॉक स्प्लिटचा लाभ देणार आहे.

शेअर्समध्ये तुफानी खरेदी :
‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर काल 1581.05 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील एका महिन्यात ‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्समध्ये 3.66 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मात्र 2023 हे वर्ष या कंपनीच्यागुंतवणूकदारांसाठी फारसे चांगले नव्हते. मागील एका वर्षात ‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरची किंमत 31.98 टक्के कमजोर झाली आहे. तर YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 9.91 टक्के कमजोर झाले आहेत.

व्यापार विस्तार :
‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनीने नुकताच OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण केल्याची घोषणा केली आहे. ‘टिप्स इंडस्ट्रीज’ निर्मित ‘गॅस लाइट’ हा चित्रपट ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ वर प्रसारित होणार आहे. म्युझिक अल्बम रिलीज करण्यासोबतच कंपनीने 2 पंजाबी चित्रपटांची निर्मिती केली असून लवकरच प्रदर्शित करणार आहे. याशिवाय कंपनीने 3 मराठी चित्रपटांची देखील निर्मिती केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tips Industries Share Price on 04 April 2023.

हॅशटॅग्स

#Tips Industries Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x