22 November 2024 3:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही
x

Mankind Pharma IPO | काँडम बनवणाऱ्या फार्मा कंपनीचा IPO लाँच होतोय, गुंतवणूकीची मजबूत संधी, कंपनीचा तपशील जाणून घ्या

Mankind Pharma IPO

Mankind Pharma IPO | ‘मॅनकाइंड फार्मा’ ही भारतातील दिग्गज फार्मास्युटिकल कंपनी 1995 साली उत्तर प्रदेश राज्यातील मेरठमध्ये 50 लाख रुपयांच्या प्रारंभिक भांडवलासह सुरू करण्यात आली होती. या कंपनीची स्थापना 28 वर्षांपूर्वी ‘राजीव जुनेजा’ आणि त्यांचे मोठे बंधू ‘रमेश जुनेजा’ आणि बहीण ‘प्रभा अरोरा’ यांनी मिळून केली होती. सध्या ‘प्रभा अरोरा’ यांचा पुत्र ‘शीतल अरोरा’ त्यांच्या वतीने कंपनीमध्ये प्रतिनिधित्व करत आहे. ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनी आपला IPO लाँच करणार आहे, अशी बातमी शेअर बाजारात आली आहे. कंपनी पुढील दोन महिन्यात आपला IPO लाँच करु शकते. (Mankind Pharma Limited)

ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजेच DRHP नुसार ‘मॅनकाइंड फार्मा’ या भारतातील चौथ्या सर्वात मोठ्या फार्मा कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 7,781.56 कोटी आणि आर्थिक वर्ष 2021 मध्ये 6,214.43 कोटी रुपये एकत्रित महसूल संकलित केला होता. देशांतर्गत विक्रीच्या बाबतीत ‘मॅनकाइंड फार्मा’ ही भारतातील चौथी सर्वात मोठी फार्मा कंपनी मानली जाते. ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीने ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून ‘अमिताभ बच्चन’ यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे.

दिग्गज मीडिया हाऊसच्या वृत्तानुसार, ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीने 2004 मध्ये दिल्लीत आपले मुख्यालय सुरू केले होते. ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीमध्ये सध्या 18,000 कर्मचारी काम करत आहेत. कंपनीसोबत 4 लाखांहून अधिक डॉक्टर, 14,000 हून अधिक फील्ड फोर्स काम करत आहे. मजबूत मार्केटिंग फोकससह ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीने फार्मा क्षेत्रातील मोठा हिस्सा काबीज केला आहे. गमतीशीर गोष्ट अशी की, ही कंपनी भारतातील एका प्रसिद्ध कंडोम बँडची मालक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mankind Pharma IPO is ready to launch in share market check details on 05 April 2023.

हॅशटॅग्स

#Mankind Pharma IPO(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x