23 November 2024 6:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Future Group Retail Share Price | फ्युचर रिटेल कंपनीचे फ्युचर बदलेल? कंपनी संबंधित मोठी घडामोड सामोरे आली, सविस्तर माहिती

Future Group Retail Share Price

Future Group Retail Share Price | एकेकाळी भारतात रिटेल जायंट म्हणून मिरवणाऱ्या ‘फ्युचर ग्रुप’ च्या कंपन्या मोठ्या कर्जामुळे दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. याचा नकारात्मक परिणाम कंपन्यांच्या शेअर्सवरही पाहायला मिळत आहे. ‘फ्युचर रिटेल’ कंपनीवर प्रचंड कर्ज असल्याने कंपनीचे शेअर्स उच्चांक किंमत पातळीवरून जवळपास 100 टक्क्यांनी खाली आले आहेत. 27 नोव्हेंबर 2017 रोजी या कंपनीचे शेअर्स 660 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 2.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ज्या लोकांनी उच्चांक किमतीवर एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 300 रुपयांवर आले आहे. (Future Group Retail Limited)

‘फ्यूचर रिटेल’ कंपनीच्या शेअरमध्ये अचानक अप्पर सर्किट लागतो, तर कधी स्टॉक अचानक कोसळतो. 2.10 रुपये शेअरची नीचांक किंमत पातळी आहे. दिवाळखोर झाल्याने कंपनीच्या शेअरची किंमत इतकी कोसळली आहे. एप्रिल 2022 मध्ये या कंपनीचे शेअर्स 34.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ही कंपनी खरेदी करण्यासाठी रिलायन्स आणि अमेझॉन सारख्या दिग्गज कंपन्या शर्यतीत होत्या, मात्र ही डील होऊ शकली नाही.

आजच्या स्टॉक वाढीचे कारण :
‘फ्युचर रिटेल’ कंपनीच्या कर्जदारांच्या समितीची बैठक नुकताच पार पडली. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, सेबीच्या नियमांनुसार 03 एप्रिल 2023 रोजी कमिटी ऑफ क्रेडिटर्सची 13 वी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली आणि काय निर्णय झाले, याची कंपनीने दिली नाही. कर्जबाजारी ‘फ्युचर रिटेल’ कंपनीचे संस्थापक ‘किशोर बियाणी’ यांनी नुकताच आपला राजीनामा मागे घेतला आहे. किशोर बियाणी यांनी 23 जानेवारी 2023 रोजी कंपनीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि संचालक पदाचा राजीनामा देऊन पडत्याग केला होता. आता तब्बल दीड महिन्यानंतर त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Future Group Retail Share Price on 05 April 2023.

हॅशटॅग्स

Future Group Retail Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x