22 November 2024 10:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Bajaj Finance Share Price | करोडपती स्टॉक! एक लाखावर दिला 22 कोटी परतावा, शेअरची कामगिरी आणि परतावा पाहून खरेदी करा

Bajaj Finance Share Price

Bajaj Finance Share Price | बजाज ग्रुपचा भाग असलेल्या ‘बजाज फायनान्स’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. ज्या लोकांनी 14 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना 100000 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. या काळात ‘बजाज फायनान्स’ कंपनीचे शेअर्स 5 रुपयांवरून वाढून 5500 रुपयांवर पोहचले आहेत. आज बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.14 टक्के वाढीसह 5,780.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 7777 रुपये होती. (Bajaj Finance Limited)

1 लाखावर 11 कोटी परतावा :
‘बजाज फायनान्स’ कंपनीचे शेअर्स 13 मार्च 2009 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 5.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 3 एप्रिल 2023 रोजी ‘बजाज फायनान्स’ कंपनीचे शेअर्स 5713 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 13 मार्च 2009 रोजी ‘बजाज फायनान्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 11.35 कोटी रुपये झाले असते. ‘बजाज फायनान्स’ कंपनीच्या शेअर्स मागील 14 वर्षांत आपल्या शेअर धारकांना 113478 टक्के परतावा कमावून दिला आहे. बजाज फायनान्स कंपनीचे बाजार भांडवल 3,45,883 कोटी रुपये आहे.

1 लाखावर 22 कोटी परतावा :
‘बजाज फायनान्स’ कंपनीने सप्टेंबर 2016 मध्ये 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. म्हणजेच कंपनीने प्रत्येक शेअरवर एक बोनस शेअर मोफत वाटप केला होता. 13 मार्च 2009 रोजी ‘बजाज फायनान्स’ कंपनीचे शेअर्स 5.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 1 लाख रुपये लावले असते ते तुम्हाला 19880 शेअर्स मिळाले असते. त्यात 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स मिळाल्यानंतर तुमच्या शेअरची एकूण संख्या 39760 झाली असती. 3 एप्रिल 2023 रोजी ‘बजाज फायनान्स’ कंपनीचे शेअर्स 5713 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या प्रकरणात सध्या तुमच्या 39760 शेअर्सचे मूल्य 22.71 कोटी रुपये झाले असते.

बजाज फायनान्स कंपनीच्या शहरास मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 198.31 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर बजाज फायनान्स कंपनीच्या शेअर्सनी मागील 1 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 22.07 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. 6 एप्रिल 2018 रोजी बजाज फायनान्स कंपनीचे शेअर्स 1933 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दीर्घ काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bajaj Finance Share Price on 05 April 2023.

हॅशटॅग्स

#Bajaj Finance Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x