23 November 2024 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024
x

Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जोरदार घसरले, तुमच्या शहरातील आजचे घसरलेले नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | सोन्याच्या दरात शनिवारी घसरण पाहायला मिळाली होती. या दिवशी सोन्याने 61,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडला होता. आता त्या दिवसापासून घट होताना दिसत आहे. शनिवारीपाठोपाठ रविवारीही सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. तत्पूर्वी शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (एमसीएक्स) घसरण पाहायला मिळाली होती. शुक्रवारी 60856 रुपयांवर बंद झालेल्या सोन्याव्यतिरिक्त चांदीही रेड झोनमध्ये ट्रेड करताना दिसत होती.

आज सोन्याच्या दरात घसरण
फेब्रुवारीतही सोन्याने तेजीच्या बाबतीत मागील विक्रम मोडला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या घसरणीनंतर आता या मौल्यवान धातूला पुन्हा गती मिळत आहे. 2023 मध्ये सोन-चांदी तेजीचा नवा विक्रम रचतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या काळात सोने 65,000 रुपये आणि चांदी 80,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. मात्र आज रविवारी सोने 341 रुपयांच्या घसरणीसह 60515 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 74554 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे. या घसरणीचा परिणाम आज सराफा बाजारातही पाहायला मिळेल.

एमसीएक्सवरील आजचा दर
याआधी शुक्रवारी एमसीएक्सवर सोने 60856 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 74555 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती. तत्पूर्वीच्या विक्रमी तेजीत आता सोने आणि चांदीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारीही सराफा बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. ट्रेडींग सत्राच्या शेवटी 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,623 रुपये प्रति 10 ग्राम आणि चांदी 74164 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली होती. सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,700 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,760 रुपये आहे.

दर तपासा
तुम्ही तुमच्या घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही 8955664433 नंबरवर मिस्ड कॉल देऊनच किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचे मेसेज येतील.

Gold-Rates-in-2023

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 09 April 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x