26 November 2024 4:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | IREDA शेअर मालामाल करणार, मल्टिबॅगर स्टॉक खरेदीला गर्दी, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Mutual Fund SIP | 10 कोटी रुपये परतावा हवा असल्यास किती मासिक SIP करावी लागेल, फायद्याचे बेसिक कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा Free Home Loan | फ्री होम लोनसाठी वापरा 'ही' एक भन्नाट ट्रिक; व्याजाचे सर्व पैसे मिळून मालामाल व्हाल, लक्षपूर्वक वाचा TTML Share Price | TTML शेअर रॉकेट तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर स्टॉक फोकसमध्ये आला - NSE: TTML Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Low Cost Business | कमी पैशांत सुरू होणाऱ्या या व्यवसायातून करा लाखोंची कमाई; अशी करा सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण माहिती Quant Small Cap Fund | मार्ग श्रीमंतीचा, 10,000 रुपयांच्या SIP बचतीवर मिळतील 5 कोटी रुपये, इथे पैसा वाढवा - Marathi News
x

Power Finance Corporation Share Price | PPF, FD, EPFO सोडा आणि या सरकारी कंपनीचे शेअर्स घ्या, लाभांश सोबत भरघोस परतावा

Power Finance Corporation Share Price

Power Finance Corporation Share Price | शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, जे आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत फायदा देतात. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, आणि बँक मुदत ठेवीपेक्षा स्टॉकमध्ये लाभांश देणाऱ्या शेअर्समध्ये पैसे लावणे खूप फायद्याचे ठरू शकते. लाभांश देणारे स्टॉक्स बऱ्याच वेळा गुंतवणूकदारांना दुहेरी फायदा देतात. अशा शेअर्सचे लाभांश उत्पन्न कधीकधी पीपीएफ, ईपीएफ आणि मुदत ठेवींपेक्षा अनेक पट जास्त असते. याशिवाय या शेअरमध्ये मोठी उसळी देखील पाहायला मिळत असते. (Power Finance Corporation Limited)

‘पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन’ कंपनीचे शेअर्स असेच मजबूत लाभांश देणाऱ्या स्टॉकपैकी एक आहेत. या सरकारी कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षभरात आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 10 रुपये लाभांश वाटप केला आहे. ‘पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन’ कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका वर्षात जवळपास 30 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ‘पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन’ कंपनीचे शेअर्स एका वर्षापूर्वी 122 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर PFC कंपनीचे शेअर्स 6 एप्रिल 2023 रोजी BSE इंडेक्सवर 157.45 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ‘पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन’ कंपनीचे लाभांश उत्पन्न आणि कंपनीचा स्टॉक रिटर्न गुंतवणूकदारांना बंपर फायदा मिळवून देतो.

कंपनीचा लाभांश इतिहास :
‘पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन’ कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 10 रुपये लाभांश वाटप केला आहे. या सरकारी कंपनीने मागील वर्षभरात एकूण चार वेळा लाभांश वाटप केला आहे. PFC कंपनीने जून 2022 मध्ये प्रति शेअर 1.25 रुपये लाभांश वाटप केला होता. या सरकारी कंपनीने सप्टेंबर 2022 मध्ये प्रति शेअर 2.25 रुपये लाभांश दिला तर नोव्हेंबर 2022 मध्ये प्रति शेअर 3 रुपये अंतरिम लाभांश वाटप केला होता. या कंपनीने फेब्रुवारी 2023 मध्ये 3.50 रुपये अंतरिम लाभांश वाटप केला होता. ‘पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन’ कंपनीचा आर्थिक वर्ष 2022-23 साठी डिव्हीडेंट यिल्ड 8.35 टक्के आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेचा व्याज दर मागील वर्षी 7.10 टक्के होता. त्याच वेळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर 8.10 टक्के आहे. आणि बँक मुदत ठेवीं म्हणजेच FD चा व्याज दर 5.50 टक्के वरून 7 टक्के वर आला आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे लाभांश प्रमाण मागील एका वर्षात 8.35 टक्के राहिले आहे. यासोबतच कंपनीच्या शेअर्समध्येही सुमारे 30 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Power Finance Corporation Share Price on 08 April 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x