22 November 2024 7:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

How To Apply for Domicile Certificate Online | महाराष्ट्र डोमेसाइल सर्टिफिकेटसाठी अर्ज करायचा आहे? ऑनलाईन प्रोसेस फॉलो करा

How To Apply for Domicile Certificate Online

How To Apply for Domicile Certificate Online in Maharashtra | शाळा आणि महाविद्यालयात विविध कामांसाठी डोमेसाइल सर्टिफिकेट मागितले जाते. अनेक विद्यार्थी कॉलेजमध्ये स्कॉलरशिप फॉर्म अथवा अन्य कोणताही फॉर्म भारतात तेव्हा हे सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणे अनिवार्य आहे. शैक्षणिक कमासोबतच आपल्याला शासकीय परीक्षांचे फॉर्म भरताना देखील डोमेसाइल सर्टिफिकेट मागितले जाते. अशात हे डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय? ते कसे मिळते? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात आले असतील. त्यामुळे आज या बातमीमधून या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवू. (How much time does it take to get domicile certificate in Maharashtra?)

डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणजे काय?
वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट होय. तुम्ही ज्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात राहत आहात त्याचा यामध्ये पुरावा असतो. हा दाखला मिळवण्यासाठी तुम्ही 15 वाषणपसून येथील रहिवासी असणे गरजेचे आहे. किंवा तुमचे आई वडील गेल्या 9 वर्षांपासून त्या राज्यात राहत असेल पाहिजेत. तरच तुम्हाला डोमेसाइल सर्टिफिकेट मिळेल. डोमेसाइल सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात जावे लागते. अशात येते असलेली गर्दी आणि नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता शासनाने हा दाखला ऑनलाईन देखील उपलब्ध केला आहे. (What is the fee for domicile certificate in Mumbai?)

महाराष्ट्रातील डोमेसाइल सर्टिफिकेट ऑनलाईन कसे मिळवायचे – (Can I get Maharashtra domicile certificate online?)
१. ऑनलाईन पद्धतीने हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या लिंकला भेट द्या.
२. लिंकवर आल्यानंतर आधी तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या.
३. यावेळी तुम्हाला व्हेरिफाय मोबाईल युजिंग ओटीपी किंवा अपलोड कम्प्लीट प्रोफाइल युजिंग ओटीपी हे दोन पर्याय तुमच्या समोर दिसतील. यातील कोणत्याही एका पर्यायावर क्लिक करा.
४. स्क्रीनवर विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर रजिस्टर या बटणावर क्लिक करा.
५. त्यानंतर पुन्हा एकदा आपले सरकारच्या दिलेल्या वेबसाईटवर जा.
६. तिथे तुम्ही त्यात केलेले युजर आयडी आणि पासवर्ड टाका.
७. पुढे डाव्या बाजूला रेव्हेन्यू डिपार्टमेंट हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
८. त्यानंतर ड्रॉप डाऊन असा पर्याय दिसेल. तेथून रेव्हेन्यू सर्व्हिस हा ऑप्शन्स क्लिक करा.
९. यानंतर तुमची काही माहिती समोर विचारली जाईल. ती व्यवस्थित भरून सबमिट या बटणावर क्लिक करा. यावर तुम्हाला एक नंबर मिळेल. त्या क्रमांकाचा वापर तुम्ही तुमच्या डोमेसीअल सर्टिफिकेटची सद्याची स्थिती समजून घेऊ शकता.

डोमेसीअल सर्टिफिकेट काढण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक
ऍड्रेस प्रुफ : सर्वात आधी तुम्हाला ज्या ठिकाणचे डोमेसीअल सर्टिफिकेट काढायचे आहे तेथील पत्त्याचा पुरावा तुमच्याकडे असायला हवा. यासाठी लाइट बिल, पासपोर्ट, पाणीपट्टी पावती, भाडे पावती, शिधापत्रिका, दूरध्वनी बिल, 7/12 आणि 8 अ चा उतारा ड्रायविंग लायसन्स, मालमत्ता कर पावती या पैकी काही कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. (What is the processing time for Domicile Certificate in Maharashtra?)

तुमच्या ओळखीचा पुरावा :
आपली स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी तुमच्याकडे ओळखीचा पुरावा असणे आवश्यक आहे. यामध्ये अर्जदाराचा फोटो, पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ‘आरएसबीवाय’ कार्ड या पैकी काही कागदपत्रे तुमच्याकडे असायला हवी. (Where can I address queries regarding Domicile Certificate in Maharashtra?)

वयाचा पुरावा :
डोमेसीअल सर्टिफिकेट काढण्यासाठी तुमचे वय किती आहे या बब्बत एक पुरावा दिला जातो. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, बोनाफाइड प्रमाणपत्र, वडिलांचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा अशा काही कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.

रहिवासी पुरावा:
आता हाच कच्चा पुरावा तलाठी, कलेक्टर ऑफिस यांच्यामार्फत जारी केला जातो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: How To Apply for Domicile Certificate Online details 08 April 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x