Tata Motors Share Price | टाटा मोटर्सच्या शेअरवर ब्रोकरेज फर्म उत्साही, जाहीर केली टार्गेट प्राईस, स्टॉक खरेदीच्या प्रमाणात वाढ

Tata Motors Share Price | भारतीय ऑटो क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी ‘टाटा मोटर्स’ च्या व्यवसायात कमालीची रिकव्हरी होत आहे. मार्च 2023 तिमाहीत कंपनीच्या घाऊक आणि किरकोळ व्यवसायात अप्रतिम वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीने प्रत्येक क्षेत्रात मजबूत कामगिरी केली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत वाहनांची मागणी वाढल्याने टाटा मोटर्स कंपनीच्या व्यवसायात वाढ होत आहे. कंपनी जागतिक बाजारातही उत्तम कामगिरी करत आहे. ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या प्रवासी वाहन विभागाची एकूण देशांतर्गत विक्री आर्थिक वर्ष 2023 मध्ये 10 टक्क्यांनी वधारली. टाटा मोटर्स कंपनी ईव्ही सेगमेंटमध्ये मार्केट लीडर म्हणून उदयास येत आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये 50,000 EVs विक्रीचा महत्त्वाचा टप्पा गाठला होता. कंपनीच्या सर्व 4 SUV – Nexon, Punch, Harrier आणि Safari ला देखील जास्त मजबूत डिमांड आहे. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे 2.49 टक्के वाढीसह 437.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी कंपनीच्या मजबूत मूलभूत गोष्टी विचारात घेऊन टाटा मोटर्स स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. (Tata Motors Limited)
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल अहवाल
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, मार्च 2023 तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीचे घाऊक उत्पादन 24 टक्के YoY आणि 19 टक्के QoQ ने वाढून 94600 युनिटवर पोहोचले. आर्थिक वर्ष 2023 साठी घाऊक विक्री 9 टक्के वाढून 321300 युनिट्सवर पोहोचली आहे. लँड रोव्हरने 34 टक्के YoY आणि 22 टक्के QoQ वृध्दी नोंदवली आहे. जग्वारचे व्हॉल्यूम 27 टक्के YoY आणि 3 टक्के QoQ ने घसरले आहे. दुसरीकडे, रेंज रोव्हर आणि आरआर स्पोर्टच्या उत्पादनात सतत वाढ नोंदवली जात आहे. डिफेंड घाऊक व्यवसाय तिसऱ्या तिमाहीत 23,816 युनिट्सवरून वाढून 27,513 युनिट्सवर पोहोचले होते.
मार्च 2023 तिमाहीत ‘टाटा मोटर्स’ कंपनीचा किरकोळ व्यवसाय 30 टक्के YoY वाढून 102900 युनिटवर पोहचला आहे. तर आर्थिक वर्ष 2023 मध्ये त्यात 6 टक्के घसरण झाली आहे. कंपनीच्या किरकोळ विक्रीमध्ये प्रत्येक भागात कमालीची वाढ नोंदवली गेली आहे. जसे की EU मध्ये 46%, UK मध्ये 42 टक्के, RoW 30 टक्के, चीन मध्ये 29 टक्के आणि US मध्ये 12 टक्के आहे. कंपनीच्या ऑर्डरबुकमध्ये तिमाही आधारावर 15 हजार युनिट्सची कमतरता आली आहे.
ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, टाटा मोटर्स कंपनीचा व्यवसाय रिकव्हरी मोडमध्ये असून त्यात वाढ होत आहे. चीनच्या वाहन उद्योग व्यवसायातही चक्रीय पुनर्प्राप्ती पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, भारतीय प्रवासी वाहन व्यवसायात संरचनात्मक पुनर्प्राप्ती होत आहे. जेएलआर व्यवसायातही सुधारणा पाहायला मिळाली आहे. JLR व्यवसाय देखील पुढील काळात वाढू शकतो. देशांतर्गत बाजारात ही उद्योग वाढ स्थिर राहणार आहे. टाटा मोटर्स स्टॉक सध्या 16.9x/13.7x FY24E/FY25 कन्सोलिडेशन EPS आणि 4x/3.4x FY24-25 कन्सोलीडेशन EV/EBITDA च्या मूल्यांकनावर ट्रेड करत आहे. पुढील काळात टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 525 रुपये किंमत स्पर्श करू शकतात असे तज्ञ म्हणतात.
रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक :
दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सचा वाटा मोठा आहे. आता त्यांचा पोर्टफोलिओ त्यांची पत्नी ‘रेखा झुनझुनवाला’ हाताळत आहे. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे 52,256,000 शेअर्स आहेत. रेखा झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्स कंपनीचे 1.6 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Motors Share Price on 08 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK