24 April 2025 1:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेंदाता कंपनी शेअर्समध्ये तुफान तेजीचे संकेत, जोरदार खरेदी सुरु, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL TTML Share Price | टाटा ग्रुपचा पेनी स्टॉक पुन्हा तेजीत; 5 वर्षात 2,028% परतावा दिला, टार्गेट अपडेट जाणून घ्या - NSE: TTML Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये तुफान तेजीचे संकेत, सुस्तावलेला स्टॉक पैसा वसूल करणार - NSE: TATATECH Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये 3000 रुपये जमा केल्यास 5 वर्षांत किती मिळतील? अशी ठरवा बचत रक्कम
x

Hindustan Foods Share Price | कडक! 1 रुपयेच्या शेअरने गुंतवणूकदारांना 10000 वर दिला 56 लाख परतावा, खरेदीपूर्वी डिटेल्स वाचा

Hindustan Foods Share Price

Hindustan Foods Share Price | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अनेक लोकांचे आयुष्य बदलले आहे. शेअर बाजारात जोखीम आहे, मात्र फायदा ही जास्त आहे. म्हणूनच शेअर बाजारात गुंतवणूक करताना स्टॉकचे मूलभूत तत्व तपासून पैसे लावल्यास नक्कीच परतावा मिळेल. स्टॉक निवडताना जर थोडीशीही चूक झाली तर तुम्ही रातोरात कंगाल होऊ शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला एका मल्टीबॅगर स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत. या कंपनीचे नाव आहे, ‘हिंदुस्तान फूड्स’. (Hindustan Foods Limited)

11 वर्षात दिला 56000 टक्के परतावा :
‘हिंदुस्तान फूड्स’ कंपनीच्या शेअरने मागील 11 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 56000 टक्के परतावा कमावून दिला आहे. या शेअरची किंमत 1 रुपयांवरून वाढून 560 रुपयांवर पोहोचली आहे. ‘हिंदुस्तान फूड्स’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 749.15 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 328.73 रुपये होती. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक दीड टक्क्यांच्या वाढीसह 565.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

24 ऑगस्ट 2012 रोजी ‘हिंदुस्तान फूड्स’ कंपनीचा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 1 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 565.35 रुपयांवर पोहोचला आहे. जर तुम्ही 24 ऑगस्ट 2012 रोजी या कंपनीच्या शेअरमध्ये 10000 रुपये लावले असते तर तुम्हाला 10,000 शेअर्स मिळाले असते. सध्याच्या किमतीनुसार तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 56.53 लाख रुपये झाले असते.

सहा वर्षांत दिला 1627 टक्के परतावा :
‘हिंदुस्तान फूड्स’ कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 35000 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील सहा वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1627 टक्के परतावा कमावून दिला आहे. 7 एप्रिल 2017 रोजी ‘हिंदुस्तान फूड्स’ कंपनीचे शेअर्स 32.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 6 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 565.35 रुपयांवर क्लोज झाला आहे. यानुसार सहा वर्षांपूर्वी तुम्ही जर या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला आता 17.43 लाख रुपये परतावा मिळाला असता.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘हिंदुस्तान फूड्स’ ही कंपनी मुख्यतः फूड आणि बेव्हरेज, होम केअर फॅब्रिक, केअर ब्युटी आणि पर्सनल केअर, हेल्थ केअर आणि वेलनेस लेदर आणि स्पोर्ट्स, फूटवेअर आणि पेस्ट कंट्रोल क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीमध्ये प्रवर्तकांचा वाटा 64.85 टक्के आणि सार्वजनिक भागीदारी 35.15 टक्के आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hindustan Foods Share Price on 08 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Hindustan Foods Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या