26 November 2024 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Low Cost Business | कमी पैशांत सुरू होणाऱ्या या व्यवसायातून करा लाखोंची कमाई; अशी करा सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण माहिती Quant Small Cap Fund | मार्ग श्रीमंतीचा, 10,000 रुपयांच्या SIP बचतीवर मिळतील 5 कोटी रुपये, इथे पैसा वाढवा - Marathi News Post Office Scheme | गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना; लाखोंचा परतावा हवा असल्यास, पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची BEL Vs HAL Share Price | BEL आणि HAL सहित हे 3 डिफेन्स शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा, यापूर्वी 573% परतावा दिला - NSE: IRB Horoscope Today | आज या 5 राशींचे नशीब फळफळणार; काहींना मिळणार प्रमोशन तर, काहींना व्यवसायात वृद्धी, पहा तुमची रास कोणती
x

Reliance Home Finance Share Price | 6 रुपयांच्या शेअरने 1 आठवड्यात 38 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स वाचून फायदा घेणार का?

Reliance Home Finance Share Price

Reliance Home Finance Share Price | दिवाळखोर उद्योगपती ‘अनिल अंबानी’ यांची ‘रिलायन्स होम फायनान्स’ कंपनी आता विकली गेली आहे. ‘ऑथम इन्व्हेस्टमेंट्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीने 3351 कोटी रुपये मूल्यावर या कंपनीचे अधिग्रहण केले असल्याची माहिती दिली आहे. या प्रक्रियेनंतर ‘रिलायन्स होम फायनान्स’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. ‘रिलायन्स होम फायनान्स’ कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.90 टक्के वाढीसह 3.33 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या स्टॉकने 29 मार्च 2023 रोजी 2.08 रुपये ही आपली 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 7 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीच्या शेअरने 6.65 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. (Reliance Home Finance Limited)

एका आठवड्यात शेअरमध्ये तुफानी तेजी :
‘रिलायन्स होम फायनान्स’ कंपनीच्या शेअरने अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 38.17 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी मागील दोन आठवड्यांच्या कालावधीत लोकांनी या स्टॉकमधून 23.79 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीच्या शेअर मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 332.47 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एक वर्षांच्या कालावधीत ‘रिलायन्स होम फायनान्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 28.54 टक्के नकारात्मक परतावा दिला होता. तर मागील दोन वर्षात या स्टॉकने लोकांना 22.88 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘रिलायन्स होम फायनान्स’ कंपनीच्या शेअर्सने सप्टेंबर 2017 मध्ये 108 रुपये ही आपली उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. आत्तापर्यंत उच्चांक किमतीवरून स्टॉकमध्ये 96.92 टक्के घसरण झाली आहे.

जून 2021 मध्ये ‘ऑथम इन्व्हेस्टमेंट्स’ कंपनीने ‘रिलायन्स होम फायनान्स’ कंपनीसाठी यशस्वी बोली लावली होती. ही कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात होती. तथापि शापूरजी पालोनजी समुहाने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे प्रश्न उपस्थित केल्यानंतर ही दिवाळखोरी प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. 3 मार्च 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘रिलायन्स होम फायनान्स’ कंपनीसाठी ‘ऑथम इन्व्हेस्टमेंट्स’ कंपनीच्या खरेदी ऑफरला मंजुरी दिली होती. ‘ऑथम इन्व्हेस्टमेंट’ कंपनीने अनिल अंबानी यांच्या मालकीच्या ‘रिलायन्स कमर्शिअल फायनान्स’ या दिवाळखोर कंपनीचे अधिग्रहण पूर्ण केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Home Finance Share Price on 08 April 2023.

हॅशटॅग्स

Reliance Home Finance Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x