Sim Card KYC Verification | मोबाईल वापरणाऱ्यांसाठी अलर्ट! सिम कार्ड KYC पडताळणी डिजिटल होणार, नवीन नियम आला

SIM Card KYC Verification | आर्थिक फसवणूक आणि बनावट सिमकार्डच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी दूरसंचार विभाग ‘नो योर कस्टमर’ (केवायसी) निकषांमध्ये बदल करण्याची योजना आखत आहे. येत्या काळात एका आयडीवर ९ सिमऐवजी फक्त ५ सिम जारी करण्यात येणार आहेत. सिम जारी करण्यासाठी डिजिटल व्हेरिफाइड कागदपत्रांचा वापर केला जाणार आहे. एवढेच नव्हे तर फसवणूक करणाऱ्यांना पकडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे.
6 महिन्यांच्या आत जारी होऊ शकतो नवा नियम
दूरसंचार विभागाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल इंटेलिजन्स युनिट (एआय आणि डीआययू) शाखेकडून नॅशनल वर्किंग ग्रुपशी सल्लामसलत करून सहा महिन्यांच्या आत केवायसीचा नवीन नियम जारी केला जाऊ शकतो. याबाबत सूत्रांनी माहिती दिली. नॅशनल वर्किंग ग्रुपमध्ये आरबीआय आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा समावेश आहे.
केवायसी नियमांमध्ये सुधारणा
केवायसी नियमांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच दूरसंचार विभाग दोन महिन्यांत फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (टीएएफ-सीओपी) पोर्टल पॅन-इंडियासाठी टेलिकॉम अॅनालिटिक्स लाँच करण्याची योजना आखत आहे. सध्या हे पोर्टल आंध्र प्रदेश, केरळ, राजस्थान, तेलंगणा आणि जम्मू-काश्मीर सारख्या राज्यांमध्ये सक्रिय आहे.
सरकार एआयचा वापर करणार
बनावट सिमकार्ड ओळखण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी एआयचा वापर केला जात आहे आणि टेलिकॉम सिम सबस्क्राइबर व्हेरिफिकेशन (एएसटीआर) साठी चेहऱ्याची ओळख देखील सरकारतर्फे संपूर्ण भारतात राबविण्यात येत आहे. हरियाणातील मेवात येथे प्रायोगिक कार्यक्रम म्हणून एएसटीआर सुरू करण्यात आला. एएसटीआरचा वापर करून सरकार बनावट कागदपत्रांचा वापर करून सिमकार्ड वापरणाऱ्या लोकांची सहज ओळख पटवू शकते. सप्टेंबर 2021 मध्ये सरकारने सिमकार्ड जारी करण्यासाठी आधार-आधारित ई-केवायसी प्रक्रियेची तरतूद सुरू केली. केवायसी नियमांमध्ये बदल हा त्या बदलाचा पुढचा भाग असेल. सध्या ९७ टक्के सिमकार्ड डिजिटल व्हेरिफाइड कागदपत्रांद्वारे दिले जातात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: SIM Card KYC Verification completely digital new rule check details on 08 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK