28 November 2024 12:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | ही एक ट्रिक वापरा आणि वृद्ध आई-वडिलांसाठी कन्फर्म लोअर सीट बुक करा, प्रवास सुखकर होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, मजबूत कमाईची संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या पार, स्टॉक सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल सह टार्गेट नोट करा - NSE: YESBANK Surya Rashi Parivartan | सूर्य राशी परिवर्तनामुळे 'या' राशींचं नशीब उघडणार; कामाचा व्याप संपून पैसे येण्याचा मार्ग मोकळा होणार Vodafone Idea Share Price | पेनी शेअर रॉकेट स्पीडमध्ये, 5 दिवसात 25% परतावा दिला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA Kotak Bank Salary Account | 99% सरकारी कर्मचाऱ्यांना 'या' योजनेची माहिती नाही, सॅलरी अकाउंटवर स्पेशल ऑफर - Marathi News Honda SP 125 on EMI | बाईक प्रेमींसाठी खुशखबर; केवळ 5000 भरा आणि बाईकचा ताबा मिळवा, एकाच वेळेला धावेल 700 KM
x

Tata Communications Share Price | टाटा तिथे नो घाटा! या शेअरवर 434% परतावा प्लस डिव्हीडंड जाहीर, शेअरवर नवी टार्गेट प्राईस

Tata Communications Share Price

Tata Communications Share Price | दूरसंचार क्षेत्रात व्यापार करणाऱ्या टाटा समूहाच्या ‘टाटा कम्युनिकेशन्स’ कंपनी आपल्या शेअर धारकांना मोठा लाभ देण्याची शक्यता आहे. ‘टाटा कम्युनिकेशन्स’ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आणि या बैठकीत लाभांश वाटपाला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. टाटा कम्युनिकेशन कंपनीच्या स्टॉकबाबत अनेक ब्रोकरेज फर्म सकारात्मक असून त्यांनी शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Tata Communications Limited)

‘टाटा कम्युनिकेशन्स’ लक्ष्य किंमत :
आयसीआयसीआय सिक्युरीटी फर्मच्या अहवालानुसार, ‘टाटा कम्युनिकेशन्स’ कंपनीच्या शेअरची किंमत 1640 रुपयेपर्यंत वाढू शकते. आज सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी ‘टाटा कम्युनिकेशन्स’ कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के वाढीसह 1,264.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या संदर्भात, ‘टाटा कम्युनिकेशन्स’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 25 टक्के पर्यंत वाढू शकतात. 12 जानेवारी 2023 रोजी ‘टाटा कम्युनिकेशन्स’ कंपनीचे शेअर्स 1429.95 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. जून 2022 रोजी ‘टाटा कम्युनिकेशन्स’ कंपनीचे शेअर्स 856 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील तीन वर्षांत ‘टाटा कम्युनिकेशन्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 434.75 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे हा स्टॉक 4.16 टक्के घसरला आहे

संचालक मंडळाची बैठक :
‘टाटा कम्युनिकेशन्स’ कंपनीने सेबीला कळवले आहे की, ‘टाटा कम्युनिकेशन्स’ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 19 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले जातील. यासोबतच कंपनी लाभांश वितरणाच्या प्रस्तावावर विचार करू शकते.

कंपनीचे आर्थिक तिमाही निकाल :
डिसेंबर 2022 तिमाहीत ‘टाटा कम्युनिकेशन्स’ कंपनीने 4559.09 कोटी रुपये कमाई केली होती. मागील एका वर्षांच्या याच कालावधीच्या तुलनेत उत्पन्न 8.45 टक्के वाढले आहे. एक वर्षभरापूर्वी कंपनीचे एकूण उत्पन्न 4203.59 कोटी रुपये होते. त्यात कंपनीचा निव्वळ नफा 387.04 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Communications Share Price on 10 April 2023.

हॅशटॅग्स

Tata Communications Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x