20 April 2025 9:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

ते ट्विट! जिवंत असताना करकरेंना त्रास दिला; निधन झाल्यावर कुटुंबावर पैसे फेकले

Narendra Modi, Priyanka Chaturvedi

मुंबई : काल साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल खळबळजनक विधान केले होते आणि देशात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांकडून साध्वींच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. दरम्यान, सामान्यांपासून ते विरोधी पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटताच साध्वी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असून ते माझे वैयक्तिक मत असल्याचीही कबुली दिली आहे आणि भाजपने देखील प्रकरण अंगलट येईल म्हणून सदर विषयावर हात वर केले आहेत. दरम्यान, भाजप आता विषयाला बगल देण्यासाठी मोदी करकरेंच्या कुटुंबियांना भेटले होते असा खोटा कांगावा करत आहे.

दरम्यान, हिंदुत्वाच्या अजेंड्यावरून भाजप नेहमीच तत्कालीन राज्य एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांना लक्ष करत होते. त्याला अनुसरून तत्कालीन काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी मोदींना लक्ष करत याच प्रकरणावरून ट्विट केलं होतं’ “जिवंत असताना करकरे यांचा अपमान केला, जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या कुटुंबावर पैसे फेकले, आता पुन्हा त्यांची प्रतिमा खराब करून तुम्ही त्यांना दुसऱ्यांदा मारण्याचा प्रयत्न केला, पंतप्रधान शरम करा. कालच प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत मातोश्रीवर जाऊन शिवबंधन हातात बांधलं आणि यापुढे शिवसेनेसाठी काम करू असं स्पष्ट केलं. त्यामुळे आता त्या युतीचा भाग असल्याने सहयोगी पक्ष म्हणून पुन्हा प्रकाश झोतात येऊ शकतात.

आज जरी कविता करकरे यांचं निधन होऊन अनेक वर्ष झाली असली तरी त्यावेळी कविता करकरे यांनी कोणत्याही राजकीय व्यक्तींची भेट घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. दरम्यान नोव्हेंबर २००९ मध्ये कविता करकरे आणि स्मिता साळसकर यांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती आणि माध्यमांना सविस्तर माहिती देखील दिली होती.

दरम्यान, २००८ मध्ये मुंबईवर हल्ला झाला तेव्हा मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी ते मुंबईत आले आणि शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांसाठी त्यांनी गुजरात सरकारतर्फे एक कोटी रुपयांचे साह्य़ जाहीर केले. मात्र त्यावेळी शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांनी ते साह्य़ घेण्यास स्पष्ट नकार दिला होता हे सांगण्याचं भाजप धाडस करताना दिसत नाही.

दरम्यान काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी प्रज्ञा सिंग यांची उमेदवारी एका महान संस्कृतीचं प्रतिक असून काँग्रेसला ते अत्यंत महागात पडेल, असे धक्कादायक उत्तर मोदींनी दिलं आहे. सदर विषय पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या