25 November 2024 3:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
x

Penny Stocks | गुंतवणुकदारांना मालामाल करणाऱ्या पेनी स्टॉकची लिस्ट सेव्ह करा, हे शेअर्स तुमचे पैसे अनेक पटींनी वाढवतील

Penny Stocks

Penny Stocks | शेअर बाजारात गुंतवणूक करून अनेक गुंतवणुकदार श्रीमंत झाले आहेत. मात्र, यासाठी योग्य वेळी योग्य स्टॉक निवडणे खूप महत्वाचे असते. आज या लेखात आम्ही तुम्हाला काही मायक्रो कॅप स्टॉक्स म्हणजेच पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्यात पैसे लावून अनेक लोक करोडपती झाले आहेत. पेनी स्टॉक्स गुंतवणुकीसाठी खूप धोकादायक असतात, मात्र दर्जेदार पेनी स्टॉक दीर्घकाळात तुम्हाला करोडपती बनवू शकतात. चला तर मग जाणून घेऊ करोडपती बनवणाऱ्या पेनी स्टॉकबद्दल.

शेअर बाजारचा पूर्वीचा डेटा असे दर्शवतो की, एप्रिल 2013 मध्ये 12 स्टॉक असे आहेत ज्यांची किंमत 1 रुपये पेक्षाही कमी होती. मागील 10 वर्षांत या शेअरची किंमत 208 पट अधिक वाढली आहे. ‘शुक्र फार्मास्युटिकल्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना सर्वाधिक परतावा कमावून दिला आहे. मागील दहा वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 20,744 टक्के वाढली आहे. या कंपनीचे शेअर्स एप्रिल 2013 मध्ये 0.25 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. तर आज 11 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 1.32 टक्के वाढीसह 53.70 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. 2013 मध्ये ज्या लोकांनी या स्टॉक मध्ये 1,00,000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 2 कोटीपेक्षा जास्त झाले आहे.

‘शुक्र फार्मास्युटिकल्स’ नंतर ‘राज रेयॉन इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने देखील आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. एप्रिल 2013 मध्ये या कंपनीचे शेअर्स 0.82 पैसे किमतीवरून वाढून 11 एप्रिल 2023 रोजी 57.85 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यापाठोपाठ ट्रायडेंट कंपनीच्या शेअरने लोकांना 3,225 टक्के परतावा कमावून दिला आहे. इक्विप सोशल इम्पॅक्ट टेक्नॉलॉजीज कंपनीने 2,990 टक्के परतावा दिला आहे. XT ग्लोबल इन्फोटेक कंपनीने 2,923 टक्के परतावा दिला आहे. मिड इंडिया इंडस्ट्रीज कंपनीने 2,375 टक्के परतावा दिला आहे. शेअर बाजार तज्ञ पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात. तज्ञ नेहमी वाढता व्यवसाय गॉडेल आणि त्यांच्या स्पर्धक कंपन्याच्या तुलनेत नफा कमावणाऱ्या पेनी स्टॉक कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देतात.

बंपर परतावा देणारे पेनी स्टॉक :
आणखी काही पेनी स्टॉक आहेत ज्यांनी मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. एड्रोइट इन्फोटेक, राधे डेवलपर्स (इंडिया) Bampsl सिक्योरिटीज, विस्टा फार्मास्युटिकल्स, डुकॉन इंफ्राटेक्नोलॉजीज, आणि BLS Infotech या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. या सर्व कंपन्याच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 1,000 टक्के ते 2,268 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks which has given huge Return to shareholders check list on 11 April 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(544)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x