22 November 2024 6:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कर्नाटक निवडणुकीत मोदी-शहांचा गुजरात पॅटर्न, पहिल्या उमेदवार यादीत 52 नवे चेहरे, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचाही पत्ता कट

Karnataka Assembly Election 2023

Karnataka Assembly Election 2023 | कर्नाटक निवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेत असल्याचं निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच म्हटलं जाऊ लागलं आहे. त्याचेच पडसाद तीव्र होताना दिसत आहेत. आज म्हणजे मंगळवारी कर्नाटकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. विधानसभा निवडणुकीला एक महिना शिल्लक असताना पक्षात मोठी बंडखोरी झाली आहे. येथे भाजपचे सहा वेळा आमदार राहिलेले आणि मुख्यमंत्री राहिलेले जगदीश शेट्टर यांनी पक्षाचा निर्णय स्वीकारण्यास नकार दिला आहे. पक्षनेतृत्वाने त्यांना तिकीट दिले जाणार नाही, असे सांगून इतरांसाठी जागा सोडण्यासाठी तयार राहा असं सांगितले आहे. जगदीश शेट्टर २०१२ मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. विशेष म्हणजे कर्नाटकात भाजपने आजच उशिरा विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे.

सहा वेळा आमदार आणि माजी मुख्यमंत्री
जगदीश शेट्टार हे हुबळीचे आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी सहा वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत शेट्टर 21 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे महेश नलवाड यांचा पराभव केला. शेट्टर यांनी पत्रकारांना सांगितले की, गेल्या सहा निवडणुकांमध्ये ते सातत्याने विजयी होत आहेत. त्यांच्या विजयाचे अंतर 21000 पेक्षा जास्त आहे. पक्षाला मी विचारले माझ्यात कमतरता काय आहे? गेल्या आठवड्यात दिल्लीत पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान पहिल्या यादीवर खूश नव्हते आणि पहिल्या यादीत आयत्यावेळी मोठे बदल होणार याचे संकेत मिळाले होते.

गुजरातच्या धर्तीवर कर्नाटकात नव्या चेहऱ्यांना संधी
मी भाजपशी पूर्ण निष्ठा व्यक्त केली आहे. पण पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या आवाहनानंतर मी खूप निराश झालो आहे. पक्षाने ज्येष्ठतेचा क्रम ठरवावा, अशी माझी इच्छा आहे. निवडणूक कोण लढवणार हे कसे ठरवायचे याबाबत संभ्रम आहे. विशेष म्हणजे भाजपला गुजरातच्या धर्तीवर कर्नाटक निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची आहे अशी खंत जगदीश शेट्टार यांनी बोलून दाखवताना पक्ष सोडण्याचेही संकेत दिले.

उमेदवारांची पहिली यादी जाहीर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. कर्नाटक निवडणुकीसाठी पक्षाने १८९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, भाजप नव्या पिढीच्या नेतृत्वाच्या बाजूने आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १८९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यात ५२ नवे चेहरे, आठ महिला ंचा समावेश आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आपल्या पारंपरिक शिगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. राज्यमंत्री बी श्रीरामुलू बेल्लारी ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र येडियुरप्पा शिकारीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

52 नवे चेहरे मैदानात
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी अरुण सिंह यांनी येथे पत्रकारांशी बोलताना उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. या यादीत आर अशोक यांना कनकपूरमधून तिकीट देण्यात आले आहे. त्यांची लढत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांच्याशी होणार आहे. चन्नापट्टणमध्ये पक्षाने माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासमोर सीपी योगेश्वर यांना उमेदवारी दिली आहे. भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर भाजपच्या बड्या नेत्यांनी बैठकांच्या अनेक फेऱ्या घेतल्या आणि उमेदवारांची नावे निश्चित केली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Karnataka Assembly Election 2023 BJP released first candidates list check details on 11 April 2023.

हॅशटॅग्स

#Karnataka Assembly Election 2023(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x