22 November 2024 5:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Vardhman Special Steels Share | मार्ग श्रीमंतीचा! 947 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा शेअर पुन्हा जोरदार तेजीत, स्टॉक डिटेल्स पहा

Vardhman Special Steels Share

Vardhman Special Steels Share | लोखंड आणि पोलाद उत्पादने बनवण्याऱ्या ‘वर्धमान स्पेशल स्टील्स’ कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह 428.1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.24 टक्के घसरणीसह 415.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,732 कोटी रुपये आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘वर्धमान स्पेशल स्टील्स’ कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड होते. तज्ज्ञांच्या मते कंपनीच्या शेअर्समध्ये ही मजबूत वाढ होण्याचे कारण म्हणजे आज कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक देखील होणार आहे. या कंपनीने काही दिवसांपूर्वी सेबीला पाठवलेल्या माहिती म्हंटले होते की, कंपनीचे संचालक मंडळ 12 एप्रिलच्या बैठकीत बोनस शेअर वाटप करण्याचा प्रस्ताव विचारात घेऊ शकतात. (Vardhman Special Steels Limited)

शेअरची कामगिरी :
मागील 3 वर्षात ‘वर्धमान स्पेशल स्टील्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 947 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 3 वर्षांपूर्वी ‘वर्धमान स्पेशल स्टील्स’ कंपनीचे शेअर्स 40.9 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज हा स्टॉक आता 415.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 2023 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत कंपनीच्या या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 37.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 62.58 टक्के परतावा कमावून दिला आहे.

बोनस शेअरची संभाव्य घोषणा :
कंपन्या बऱ्याच वेळा आपल्या शेअर धारकांना प्रोत्साहन म्हणून बोनस शेअर्सचे वाटप करतात. या बोनस शेअरचे प्रमाण कंपनीचे संचालक मंडळ निश्चित करत असते. बोनस शेअर्स जाहीर करतात 3 महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या जाजात. रेकॉर्ड तारीख, एक्स तारीख, आणि इश्यू तारीख. बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख ही तारीख म्हणजे या तारखे पर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना बोनस शेअर्स वाटप केले जातात. एक्स बोनस तारीख म्हणजे सामान्यतः रेकॉर्ड तारखेच्या एक दिवस आधीचा दिवस असतो. बोनस शेअर्ससाठी पात्र होण्यासाठी गुंतवणूकदाराने कंपनीचे शेअर्स एक्स डेटच्या किमान एक किंवा दोन दिवस आधी धारण करणे आवश्यक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vardhman Special Steels Share Price on 12 April 2023.

हॅशटॅग्स

Vardhman Special Steels Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x