24 November 2024 9:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Nettlinx Share Price | 188 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर फ्री बोनस शेअर्स जाहीर, रेकॉर्ड डेटपूर्वी खरेदी केल्यास फायदा होईल

Nettlinx Share Price

Nettlinx Share Price | ‘नेटलिंक्स लिमिटेड’ कंपनीने आपल्या शेअर धारकांसाठी एक खुशखबर जाहीर केली आहे. ‘नेटलिंक्स लिमिटेड’ ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच पात्र शेअर धारकांकडे असलेल्या प्रत्येक एका शेअरवर कंपनी एक बोनस शेअर मोफत देणार आहे. कंपनीने बोनस शेअर वाटपाची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. आज गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी ‘नेटलिंक्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 202.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Nettlinx Limited)

‘नेटलिंक्स लिमिटेड’ स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये, माहिती दिली आहे की, “सेबीला सूचित केले जाते की ‘लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन-2015’ च्या नियम 42 नुसार, ‘नेटलिंक्स लिमिटेड’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर वाटप करेल. यासाठी कंपनीने सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड म्हणून निश्चित केला आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘नेटलिंक्स लिमिटेड’ ही कंपनी ‘नेटलिंक्स ग्रुप’ चा इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर भाग म्हणून काम करते. 93+ लाईव्ह स्थानांसह ‘नेटलिंक्स लिमिटेड’ कंपनी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील प्रमुख इंटरनेट सेवा प्रदान करणारी आणि कॉल सेंटर सेवा प्रदात्यांपैकी एक मानली जाते. कंपनी आपल्या ग्राहकांना पूर्णपणे एकात्मिक नेटवर्क प्लॅटफॉर्म सेवा ऑफर करते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 226.91 कोटी रुपये आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
‘नेटलिंक्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स आज 4.98 टक्के वाढीसह 202.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरने मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 188.46 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 153.13 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारावर या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 89.08 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 133.29 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nettlinx Share Price on 13 April 2023.

हॅशटॅग्स

Nettlinx Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x