24 November 2024 3:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Coal India Share Price | FD, PPF, EPF सोडा, आणि या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करा, भरघोस परतावा आणि लाभांश मिळेल

Coal India Share Price

Coal India Share Price | ‘कोल इंडिया लिमिटेड’ या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 21.01 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘कोल इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स चांगल्या व्हॉल्यूमसह ट्रेड करत आहेत. ‘कोल इंडिया’ कंपनीने आपले उत्पादन प्रमाण 700 दशलक्ष टन पर्यंत वाढवले आहे. कंपनीची सर्व कामगिरी विचारात घेऊन ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टने कोल इंडिया कंपनीच्या शेअर्सवर 260 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टने ‘कोल इंडिया’ कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी कोल इंडिया कंपनीचे शेअर्स 0.83 टक्के घसरणीसह 225.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Coal India Limited)

शेअरची लक्ष्य किंमत :
ब्रोकरेज हाऊसने ‘कोल इंडिया’ कंपनीच्या शेअर्सवर 260 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीवरून 20 टक्के अधिक वाढू शकतो. सरकारी मालकीच्या कोल इंडिया कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के वाढीसह 227.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कोल इंडिया कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 263.30 रुपये होती. त्याच वेळी या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 164.75 रुपये होती.

गुंतवणुकीवर परतावा :
मागील एका वर्षात पीपीएफ सारख्या गुंतवणुकीतून लोकांना 7.10 टक्के परतावा मिळाला. ईपीएफओ मध्ये गुंतवणूक केल्यास 8.10 टक्के परतावा मिळतो. मात्र कोल इंडिया या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात 21.09 टक्के परतावा दिला आहे. आणि कंपनीने सोबत आपल्या शेअर धारकांना 28.25 रुपये प्रति शेअर लाभांश देखील वाटप केला होता. कोल इंडिया लिमिटेड कंपनी मागील काही वर्षांपासून नियमितपणे शेअर धारकांना लाभांश देत आहे. कोल इंडिया कंपनीचा वार्षिक लाभांश उत्पन्न 17.50 टक्के आहे. कंपनीच्या 17.50 टक्के या लाभांश उत्पन्नाच्या तुलनेत PPE, EPF आणि मुदत ठेवीतून मिळणारा परतावा खूप कमी आहे. बैंक एफडीचे दरही 5 ते 6.50 टक्के असतात.अशा परिस्थितीत कोल इंडिया कंपनीच्या लाभांश उत्पन्नाने तुमची जास्त कमाई होऊ शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Coal India Share Price on 13 April 2023.

हॅशटॅग्स

#Coal India Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x