22 November 2024 6:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Hardwyn India Share Price | 246 टक्के परतावा देणारा शेअर स्प्लिट होणार, कमी किमतीत जास्त शेअर खरेदीची मोठी संधी

Hardwyn India Share Price

Hardwyn India Share Price | ‘हार्डविन इंडिया’ या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना घसघशीत नफा मिळवून दिला आहे. आता ही कंपनी आपले शेअर्स विभाजित करणार आहे. ‘हार्डविन इंडिया’ कंपनीने बुधवार दिनाक 12 एप्रिल 2023 रोजी सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीने 26 एप्रिल 2026 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे वरिष्ठ स्टॉक विभाजनाच्या प्रस्तावावर चर्चा करतील. स्टॉक स्प्लिटची बातमी येताच ‘हार्डविन इंडिया’ कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. आज गुरूवार दिनाक 13 एप्रिल 2023 रोजी ‘हार्डविन इंडिया’ कंपनीचे शेअर्स 20.00 टक्के वाढीसह 304.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Hardwyn India Limited)

शेअरची वाटचाल :
26 एप्रिल 2018 रोजी ‘हार्डविन इंडिया’ कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. त्यावेळी शेअरची किंमत फक्त 6.65 रुपये होती. तेव्हापासून म्हणजे आतपर्यंत म्हणजेच मागील 4 वर्षात ‘हार्डविन इंडिया’ कंपनीचे शेअर्स 3,730.83 टक्के वाढले आहेत. जर तुम्ही चार वर्षापूर्वी ‘हार्डविन इंडिया’ कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 38 लाख रुपये झाले असते. मागील एका वर्षात ‘हार्डविन इंडिया’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 246.36 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतपर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25.22 टक्के नफा कमावून दिला आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘हार्डविन इंडिया’ ही 659 कोटी रुपये बाजार भांडवल असणारी स्मॉलकॅप कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः व्यावसायिक सेवा प्रदान करण्याचे काम करते. कंपनी आर्किटेक्चरल हार्डवेअर आणि काचेच्या फिटिंग्जची प्रमुख उत्पादक म्हणून व्यवसाय करते. डिसेंबर 2022 या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 4.73 कोटी रुपये कोटी रुपये होता, जो मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत 3.27 कोटी रुपये होता. त्याच वेळी या कंपनीने 34.73 कोटी रुपये महसूल संकलन केला होता जो मागील वर्षी 30 कोटी रुपये जमा झाला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hardwyn India Share Price on 13 April 2023.

हॅशटॅग्स

Hardwyn India Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x