22 November 2024 11:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Sera Investments & Finance India Share Price | 1 वर्षात 484% परतावा देणारा स्टॉक, गुंतवणुकदार झटपट मालामाल झाले, तुम्ही होणार का?

Sera Investments & Finance India Share Price

Sera Investments & Finance India Share Price | ‘सेरा इंनवेस्टमेंट्स अँड फाइनेंस इंडिया’ कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळवून दिला आहे. अवघ्या 10 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य 533 टक्क्यांनी वाढवले आहे. शेअर धारकांसाठी एक मोठी बातमी अशी की, ‘सेरा इंनवेस्टमेंट्स अँड फाइनेंस इंडिया’ या NBFC कंपनीने शेअर विभाजित करण्याचा निर्णय घेतला होता. सेरा इन्व्हेस्टमेंट कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्याचे इक्विटी शेअर्स पाच तुकड्यांमध्ये विभाजित केले आहे. स्टॉक स्प्लिट नंतर शेअरची दर्शनी किंमत 2 रुपये झाली. गुरूवार दिनाक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 353.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 338.55 कोटी रुपये आहे. (Sera Investments & Finance India Limited)

स्टॉक स्प्लिट तपशील :
‘सेरा इंनवेस्टमेंट्स अँड फाइनेंस इंडिया’ कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये स्टॉक विभाजनाची रेकॉर्ड तारीख जाहीर केली होती. स्टॉक एक्सचेंज फाइलिंगनुसार या कंपनीचे शेअर्स 1 : 5 च्या प्रमाणात विभाजित झाले आहेत. कंपनीच्या संचालक मंडळाने या स्टॉक स्प्लिटसाठी शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला होता.

कंपनीचे तपशील :
‘सेरा इंनवेस्टमेंट्स अँड फाइनेंस इंडिया’ कंपनीसाठी डिसेंबर 2022 ची तिमाही फारशी फायदेशीर नव्हती. सेरा इन्व्हेस्टमेंट्स कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर 2022 मध्ये 0.69 कोटी रुपये कमी केली होती.या कंपनीला डिसेंबर 2022 च्या तिमाहीत 1.23 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 2.13 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

कंपनीच्या शेअर्सची कामगिरी :
25 एप्रिल 2022 रोजी ‘सेरा इंनवेस्टमेंट्स अँड फाइनेंस इंडिया’ कंपनीचे शेअर्स 58.25 रुपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. पुढील 10 महिन्यांत शेअरची किंमत 481 टक्क्यांच्या वाढीसह 7 फेब्रुवारी 2023 रोजी 368.85 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक पातळीवर आली आहे. सध्या शेअरची किंमत आपल्या वार्षिक उच्चांकावरून 8 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. स्टॉक आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवरून 481 टक्क्यांनी वर ट्रेड करत आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 116.63 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sera Investments & Finance India Share Price on 14 April 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x