23 November 2024 10:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537
x

Mehul Choksi Case | 13000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार गुजराती उद्योगपती मेहुल चोक्सीची CBI चौकशी आता अशक्य

Mehul Choksi Case

Mehul Choksi Case | १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार मेहुल चोक्सी अँटिग्वा-बार्बुडामध्येच राहणार आहे. अँटिग्वा-बार्बुडाच्या उच्च न्यायालयाने परवानगीशिवाय देशाबाहेर पडण्यास बंदी घातली आहे. बँक घोटाळा प्रकरणी सीबीआयला त्यांना भारतात आणून चौकशी करायची आहे. मात्र अँटिग्वा-बारबुडाच्या कोर्टाने चोक्सीच्या बाजूने निकाल दिला आहे. अशा तऱ्हेने फरार मेहुल चोक्सीला भारतात आणणे सीबीआयला थोडे अवघड झाले आहे.

चोक्सीला देशाबाहेर पाठवता येणार नाही – अँटिग्वा-बारबुडा हायकोर्ट
अँटिग्वा-बारबुडाच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी आपल्या आदेशात म्हटले आहे की, मेहुल चोक्सीला देशाबाहेर पाठवता येणार नाही. कोर्टात मेहुल चोक्सीने युक्तिवाद केला की, त्याच्यावरील प्रकरणांची चौकशी करण्याची जबाबदारी अँटिग्वाचे अॅटर्नी जनरल आणि पोलिस प्रमुखांची आहे. मेहुल चोक्सीला भारतात पाठवल्यास त्याला अमानुष वागणुकीला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

मेहुल चोक्सी अपहरण प्रकरणाच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश
अँटिग्वा-बारबुडाच्या उच्च न्यायालयात मेहुल चोक्सीने 23 मे 2021 रोजी त्याच्या अपहरण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. कोर्टाने डोमिनिकन पोलिसांना या घटनेची पुष्टी करण्याचे आदेश दिले आहेत. भारतात १३ हजार कोटीरुपयांचा घोटाळा करून हिरे व्यापारी मेहुल चोक्सी अँटिग्वा-बार्बुडायेथे पळून गेला आहे.

पीएनबीच्या १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी फरार
पंजाब नॅशनल बँकेतील १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी फरार मेहुल चोक्सीचे भारतात प्रत्यार्पण करण्याचा सीबीआयचा प्रयत्न आहे. गुन्हेगारी न्यायप्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी परदेशातून फरारी आणि गुन्हेगारांना भारतात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. प्रत्यार्पणासह इतर आवश्यक पावले उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे मेहुल चोक्सी हा पंतप्रधान यांच्या जवळील असल्याची माहिती असून एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी ‘हमारे मेहुल भाई यहा बैठे है’ असं बोलल्याचे व्हिडिओ देखील सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत.

पंतप्रधान मोदी “मेहुल-भाई” बोलले होते
याच मेहुल चोक्सीला पंतप्रधान नरेंद्र मोदी तो भारतातून फरार होण्यापूर्वी एका जाहीर कार्यक्रमात “मेहुल-भाई” बोलले होते. याची कल्पना ईडीला होती का? असा प्रश्न उपस्थित होतो. नरेंद्र मोदी मेहुल चोक्सीला ‘मेहुलभाई” बोलल्याचं व्हिडिओ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केला होता आणि तोच व्हिडिओ आम्ही आज तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mehul Choksi Case Antigua and Barbuda court permission as local high court order check details on 16 April 2023.

हॅशटॅग्स

#Mehul Choksi Case(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x