अमित शाहांना वेळ नव्हता म्हणून कडक उन्हाळ्यातील दुपारची वेळ? श्री सदस्यांसाठी कोणतीच सोय नव्हती, पण शिंदे समर्थकांसाठी शाही सुविधा
11 Shri Sadasya Dead in Navi Mumbai | महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या 11 जणांचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अनेक लोकांवर कामोठे, वाशी, पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची रविवारी (16 एप्रिल) रात्री विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी रुग्णांनी घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली.
रुग्णांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, “नागपूरवरून आल्यानंतर या घटनेची माहिती मिळाली. आम्ही थेट इथे आलो. रुग्णालयात भरती करण्यात आलेल्यांची भेट घेतली. त्यांच्याशी आम्ही बोललो. मला असं वाटतं कार्यक्रमाची चुकीची वेळ… कुणी दिली? कशी दिली? आणि ढिसाळ नियोजन. ही घटना दुर्दैवी आहे.”
उद्धव ठाकरे म्हणाले, “चौकशी करतील की नाही, कल्पना नाही. जसं तुम्ही म्हणालात की अमित शाहांना जायचं होतं म्हणून जर हा कार्यक्रम भरदुपारी घेतला असेल, तर चौकशी कोण कुणाची करणार? परंतु निरपराध जीव गेलेले आहेत. पण, तुम्ही सांगता आहात त्याप्रमाणे अमित शाहांना वेळ नव्हता म्हणून दुपारची वेळ घेतली असेल, तर खरंच खूप विचित्र प्रकार आहे.
श्री सदस्यांसाठी कोणतीच सोय नव्हती, पण शिंदे समर्थकांची शाही सुविधा
“ज्यावेळी आम्ही इथे पुरूष आणि महिलांना बोललो, तेव्हा बहुतेक जण पालघर, ठाणे, मुंबई शहर, पुणे जिल्ह्यातील लोणावळा वगैरे भागातील दिसले. त्यांनी सांगितलं की, आमच्या पोटात काही नव्हतं. काहींनी सांगितलं की, आम्ही फक्त फळं खाल्ली होती. पाण्याची व्यवस्था होती, पण उन्हाची तीव्र अतिशय होती. कार्यक्रम संपल्यानंतर गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली, असं काही जण सांगत आहेत. काहींना नंतर काय झालं माहिती नाही, दवाखान्यात आल्यानंतर त्यांना कळलं की आपल्याला दवाखान्यात आणलं आहे”, अशी माहिती अजित पवार यांनी रुग्णांच्या भेटीनंतर दिली.
एकाबाजूला रसरसस्त्या कडक उन्हात श्री सदस्यांनी खूप आधीच आणून बसवले होते आणि त्यात अनेक चुमुकली मुलं देखील होती. तर दुसऱ्या बाजूला शिंदे समर्थक मोठे नेते सोडाच, साधा नगरसेवक नसलेल्या किंवा पदाधिकारी पदावरील शिंदे समर्थकांसाठी बसायला शाही सोफे, डोक्यावर छत आणि पाठच्या बाजूला थंड गारवा मिळाला म्हणून कुलर बसविण्यात आले होते असं चित्र पाहायला मिळालं.
लोणावळ्यातील एक भगिनी भेटली होती. तिने सांगितलं की, तीन चार गाड्या आल्या होत्या. त्यातून कार्यक्रमाला आलो. काही जण 15 एप्रिलला रात्री इथे आलेले होते. मी त्यांना विचारलं की, अंघोळी वगैरे कुठे केल्या, तर त्यांनी सांगितलं की, काही केलं नाही. शौचालयाची व्यवस्था होती, असं त्यांनी सांगितलं”, असंही पवार म्हणाले.
यापैकी आठ मृत व्यक्तींची नावे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. तर, २० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करुन घरी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण २४ व्यक्तींना उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
मृत पावलेल्या व्यक्तींची नावे
खारघर येथील सोहळ्यात उपस्थित राहिलेल्या आणि उष्माघातामुळे मृत पावलेल्यांपैकी 8 महिला असून, 3 पुरुष आहेत. एकूण 11 मृतदेह पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय पनवेल नेण्यात आले होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
1) महेश नारायण गायकर (वय 42, गाव- वडाळा, मुंबई, मूळ गाव – म्हसळा मेहंदडी)
2) जयश्री जगन्नाथ पाटील (वय 54, गाव – म्हसळा, रायगड)
3) मंजुषा कृष्णा भोंबंडे (वय 51, गाव – गिरगाव मुंबई मुळगाव श्रीवर्धन)
4) स्वप्निल सदाशिव केणी (वय 30, गाव – शिरसाटबामन पाडा विरार)
5) तुळशीराम भाऊ वांगड (वय 58, गाव -जव्हार पालघर)
6) कलावती सिद्राम वायचळ (वय 45, गाव – तोडकर आळी सोलापूर)
7) संगीता संजय पवार (गाव – मंगळवेढा सोलापूर)
8) भीमा कृष्णा साळवे (वय 58, गाव – कळवा ठाणे)
उर्वरित तीन मृतांमध्ये महिला असून, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, अशी माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिली.
बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांनी “हरवले व सापडले” समितीचे प्रमुख ७९७७३१४०३१ व तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास ०२२-२७५४२३९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: 11 Shri Sadasya dead in Navi Mumabi during state government program check details on 17 April 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News