23 November 2024 4:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Mold Tek Packaging Share Price Today | मार्ग श्रीमंतीचा! 199 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर 80 टक्के डिव्हीडंड जाहीर, रेकॉर्ड डेट पहा

Mold Tek Packaging Share Price

Mold Tek Packaging Share Price Today | पॅकेजिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ‘मोल्ड-टेक पॅकेजिंग लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक खुश खबर जाहीर केली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2022-2023 च्या शेवटच्या तिमाहीसाठी 80 टक्के अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. मागील आठवड्यात कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठक पार पडली, त्यात कंपनीने अंतरिम लाभांश देण्याचा प्रस्ताव विचारात घेतला होता. (Mold Tek Packaging Limited)

आपल्या गुंतवणुकीवर परताव्याव्यतिरिक्त लोकांना लाभांश देखील मिळत असतो. साधारणपणे, कंपन्या तिमाही निकाल जाहीर केल्यावर लाभांशची घोषणा करतात. सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.67 टक्के वाढीसह 950.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अंतरिम लाभांश तपशील :
‘मोल्ड-टेक पॅकेजिंग लिमिटेड’ या पॅकेजिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅपने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये आपल्या शेअर धारकांना प्रति इक्विटी शेअर 4 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 5 रुपये असून गुंतवणूकदारांना 80 टक्के अंतरिम लाभांश म्हणून 4 रुपये प्रति शेअर मिळतील. कंपनीने या लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख म्हणून 21 एप्रिल 2023 हा दिवस निश्चित केला आहे. 2023 मध्ये कंपनीने आपल्या शेअर धारकांना 11 मे 2023 रोजी सुद्धा लाभांश वाटप केला होता.

गुंतवणुकीवर परतावा :
‘मोल्ड-टेक पॅकेजिंग’ या कंपनीच्या शेअरने दीर्घकाळात आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. गेल्या 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने शेअर धारकांना 199.41 टक्के परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच जर तुम्ही पाच वर्षांपूर्वी या शेअरवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3 लाख रुपये झाले असते.

मागील एक वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 19.32 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 मध्ये आतापर्यंत हा स्टॉक स्थिर राहिला आहे. तर माहील 6 महिन्यांत शेअरची किंमत 8.99 टक्के वाढली आहे. कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,168.89 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mold Tek Packaging Share Price Today on 17 April 2023.

हॅशटॅग्स

Mold Tek Packaging Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x