23 November 2024 5:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी किंवा कर्नाटक निवडणुकीपूर्वी शिंदेंचा एक्सिट? योजना तयार, अजित पवार - फडणवीसांची राजकीय विश्वासार्हता संपुष्टात येणार?

Ajit Pawat

Ajit Pawar | भाजपसोबत युती करून एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री म्हणून उत्तराधिकारी होण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या प्रयत्नांना वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांनी संमती दिली आहे. वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल, अशी माहिती पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना सर्वोच्च न्यायालय अपात्र ठरवेल, असे गृहीत धरून अजित पवारांनी शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेऊन भाजपसोबत जाण्याची खास योजना आखली आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजून मौन बाळगलं आहे. अजित पवार स्वत: राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करून त्यांची स्वाक्षरी घेत असले तरी मोठ्या पवारांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 2019 मध्ये अजित दादांनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना फोन करून आपला पक्ष अबाधित ठेवला होता.

शरद पवारांनी अद्याप फोन केला नाही, याचे आश्चर्य वाटते,’ असे सांगत सूत्रांनी शेवटच्या क्षणी केलेल्या हस्तक्षेपावर बोट ठेवले. अजित पवारांनी पुण्यातील दिवसभराच्या कार्यक्रमांना टाळाटाळ केली आणि आपल्या जवळच्या विश्वासू व्यक्तींशी चर्चा सुरू ठेवण्यासाठी मुंबईतच थांबले आहेत असं वृत्त आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर ही योजना प्रत्यक्षात सिद्ध होईल असे देखील सूत्रांनी म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी किंवा कर्नाटक निवडणुकीपूर्वी शिंदे यांच्या राजीनाम्याची वेळ ठरवण्याच्या पर्यायांवर भाजप विचार करत आहे असं वृत्त आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी हा बदल व्हायला हवा, असा सल्ला काही कायदेतज्ज्ञांनी भाजपाला दिला आहे. तर्क: निकालापूर्वी अजित पवारांनी शपथ घेतली तर नवे सरकार पडणार नाही आणि भाजपच्या भवितव्याचे नुकसान ही होणार नाही. गोष्टी पुढे-मागे केल्या जात आहेत. अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे,’ अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra oppositions leader Ajit Pawar gets signatures of 40 ready check details on 18 April 2023.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x