23 November 2024 6:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

कर्नाटकातील PayCM नंतर महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रालयात PayMinisters? लेटरबॉम्बमुळे भ्रष्टाचार उघड

Serious Corruption Allegations

PayMinisters | निवडणुकी दरम्यान कर्नाटकातील PayCM वादानंतर PayMLA बाबत राजकारण तापले आहे. भाजप आमदार मादल विरुपाक्ष यांच्याविरोधात काँग्रेसने ‘PayMLA’ मोहीम सुरू केली आहे. चन्नागिरीचे आमदार विरुपाक्ष आणि त्यांचा मुलगा मादल प्रशांत यांच्यावर लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. काही दिवसापूर्वी बेंगळुरूमध्ये भाजपच्या एका आमदाराचा मुलगा लाच घेताना पकडला गेला होता.

शिंदे-फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. यावेळी अडचणीत येण्याचे कारण म्हणजे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोडांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. द महाराष्ट्र स्टेट केमिस्टस् अॅण्ड ड्रगिस्टस् असोसिएशनने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिलं असून, त्यात राठोडांच्या स्वीय सहाय्यकांकडून प्रचंड पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एमएससीडीए अर्थात द महाराष्ट्र स्टेट केमिस्टस् अॅण्ड ड्रगिस्टस् असोसिएशनने टाकलेल्या लेटरबॉम्बने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री पद गमवावं लागलेल्या संजय राठोडांवर यावेळी भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत.

नेमके गंभीर आरोप काय?
पत्रात म्हटलं आहे की, “राज्यातील औषध विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानाच्या तपासण्या अन्न व औषध प्रशासनाद्वारे कायद्यानुसार नियमित केल्या जातात. औषध दुकानदारांकडून कायद्याचे पालन करताना अनावधानाने होणाऱ्या छोट्या मोठ्या त्रुटींकरता प्रशासनाद्वारे त्यांचे औषध विक्रीचे परवाने काही काळाकरिता निलंबित करणे अथवा कायमस्वरुपी रद्द करणे, अशी कारवाई केली जाते.

अन्न व औषध प्रशासनाकडून अनेक वेळा छोट्या छोट्या त्रुटीसाठी औषध विक्रेत्यांना अवाजवी शिक्षा केली जाते. औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील तरतुदीनुसार अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाई विरोधात मंत्र्यांकडे अपिल करण्याची तरतूद असल्याने औषध विक्रेते अपिल दाखल करतात. सदरहू अपिलावर स्थगनादेश देणे अथवा सुनावणी लावून निर्णय देणे अपेक्षित असते.”

अनेकवेळा शिक्षेचा पूर्ण कार्यकाळ संपून गेला तरीही मंत्र्यांच्या कार्यालयाकडून अनेक वेळा संपर्क साधून सुद्धा निर्णय दिला जात नाही. यामुळे सभासदांना नाहक शिक्षा भोगावी लागते”, असं या पत्रात म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या पत्रात असा आरोप करण्यात आला आहे की, “औषध विक्रेत्यांना मंत्र्याचे पीएस डॉ. विशाल राठोड, ओएसडी संपत डावखर, तसेच चेतन करोडीदेव यांच्याकडून प्रचंड पैशांची मागणी केली जात आहे. याबाबत संघटनेने यापूर्वीही आपणास, उपमुख्यमंत्र्यांना तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांना भेटून सूचित केलं. त्यानंतरही भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढलेला असल्याच्या तक्रारी राज्य संघटनेकडे वारंवार तोंडी स्वरूपात प्राप्त होत आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांना इशारा :
पत्रात पुढे म्हटलं आहे की, “राज्य सरकारने सदरहू बाब गांभीर्याने न घेतल्यास राज्य संघटनेस याविरोधात आंदोलन उभे करावे लागले व प्रसंगी बंदही पुकारांवा लागेल. त्यामुळे होणाऱ्या परिणामास सरकार व प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी”, असा इशाराही केमिट्स् असोसिएशनकडून देण्यात आला आहे.

मुंबईतील रस्त्याच्या कंत्राटावरुण आदित्य ठाकरे आक्रमक
दुसरीकडे, मुंबईतील रस्त्याच्या कामात घोटाळा सुरू असल्याचा आरोप माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केला आहे. आदित्य ठाकरे यांनी कंत्राटदारांवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी भाजपच्या नेत्यांच्या पत्राचा दाखला देत सरकारवर हल्ला बोल केला. चारशे किलोमीटरचे रस्त्यांची फक्त घोषणाच केली असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Serious Corruption Allegations on Cabinet Minister of Shinde Government check details on 19 April 2023.

हॅशटॅग्स

#Serious Corruption Allegations(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x