22 November 2024 1:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Quicktouch Technologies IPO | कमाईची संधी! गुंतवणुकीसाठी 'क्विक टच टेक्नॉलॉजी' चा IPO ओपन झाला आहे, ग्रे मार्केट कामगिरी चेक करा

Quicktouch Technologies IPO

Quicktouch Technologies IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आली आहे. ‘क्विक टच टेक्नॉलॉजी’ कंपनी आपला IPO शेअर बाजारात लाँच केला आहे. 18 एप्रिल 2023 रोजी ‘क्विक टच टेक्नॉलॉजी’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. (Quicktouch Technologies Limited)

हा IPO 21 एप्रिल 2023 ही IPO ची अंतिम तारीख आहे. IPO च्या पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांनी चांगला दिला. ‘क्विक टच टेक्नॉलॉजी’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 61 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. गौरव आणि मधु जिंदाल हे ‘क्विक टच टेक्नॉलॉजी’ कंपनीचे प्रवर्तक असून त्यांच्या कडे कंपनीचे एकूण 89.41 टक्के भाग भांडवल आहे.

IPO ला प्रतिसाद :
18 एप्रिल रोजी खुला करण्यात आलेला ‘क्विक टच टेक्नॉलॉजी’ कंपनीचा IPO 0.92 पट सबस्क्राइब झाला होता. IPO चा किरकोळ कोटा 0.75 पट आणि गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 1.10 पट सबस्क्राइब झाला आहे. IPO ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीच्या प्रवर्तकांचे भाग भांडवल प्रमाण 65.72 टक्क्यांपर्यंत खाली येईल. ‘क्विक टच टेक्नॉलॉजी’ कंपनीने आपल्या IPO मध्ये 50 टक्के कोटा HNI / NII साठी आणि 50 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवले आहेत.

ग्रे मार्केटमध्ये शेअरची स्थिती :
‘क्विक टच टेक्नॉलॉजी’ कंपनीचे IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 3 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर हा ट्रेंड स्टॉक लिस्टिंगपर्यंत कायम राहिला तर ‘क्विक टच टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 64 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. सध्या शेअर बाजारात अस्थिरता असून देखील ‘क्विक टच टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या IPO ला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘क्विक टच टेक्नॉलॉजी’ स्टॉक लिस्टिंग :
‘क्विक टच टेक्नॉलॉजी’ कंपनीने आपल्या IPO अंतर्गत एका लॉटचा आकार 2000 शेअर्स एवढा ठेवला आहे. ‘क्विक टच टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 2 मे 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकतात. ‘क्विक टच टेक्नॉलॉजी’ कंपनीने ‘कारलाईल फायनान्शियल सर्व्हिसेस’ या फर्मला आयपीओ रजिस्ट्रार म्हणून नियुक्त केले आहे. ‘क्विक टच टेक्नॉलॉजी’ कंपनीचे IPO शेअर्स गुंतवणूकदारांना 26 एप्रिल पर्यंत वाटप केले जातील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quicktouch Technologies IPO is opened for investment details on 20 April 2023.

हॅशटॅग्स

Quicktouch Technologies IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x