26 April 2025 4:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 27 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 27 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, 46 रुपयांच्या शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRB NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC HUDCO Share Price | सरकारी कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, पुढे मिळेल मोठा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO AWL Share Price | अदानी वील्मर शेअरमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: AWL HAL Share Price | मंदीत संधी, हा डिफेन्स कंपनीचा शेअर खरेदी करा, ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: HAL
x

Yes Bank Share Price Today | येस बँकेचा तिमाही नफा मजबूत वाढणार, शेअर प्राईस नव्या टार्गेटच्या दिशेने, स्टॉक प्राईस किती?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | ‘येस बँक’ चे शेअर्स बुधवारी 19 एप्रिल रोजी 1.20 टक्के घसरणीसह 16.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 0.30 टक्के वाढीसह 16.60 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर येस बँकेच्या शेअर्समधे तेजी मार्च 2023 च्या तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळाली होती. (Yes Bank Limited)

तज्ज्ञांच्या मते येस बँकेचा निव्वळ नफा मार्च 2023 तिमाहीमध्ये वाढू शकतो. तथापि त्याचा प्री प्रोव्हिजनिंग ऑपरेटिंग प्रॉफिट तिमाही आधारावर कमी राहण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी येस बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न काही प्रमाणात घटण्याची शक्यता वर्तवली आहे. निव्वळ व्याज मार्जिनमध्ये काही अंशी सुधारणा पाहायला मिळू शकते.

ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, मार्च 2023 तिमाहीत येस बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर 2 टक्केवरून वाढून 6 टक्के वाढीसह 1,923.8 कोटी रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तिमाही आधारावर येस बँकेचा निव्वळ नफा 524 टक्के वाढीसह 321.7 कोटी रुपये पर्यंत जाण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. वार्षिक आधारावर येस बँकेचा निव्वळ नफा 12 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.

ब्रोकरेज फर्मला येस बँकेच्या एनआयएममध्ये 6 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. जेएम फायनान्शियल फर्मने येस बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर 21.7 टक्के आणि तिमाही- दर- तिमाही आधारावर 124 टक्के वाढीसह 2,215.1 कोटी रुपये राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की, येस बँकेचा PPOP तिमाही-दर-तिमाही आधारावर 6.7 टक्क्यांच्या घसरणीसह 852.4 कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे.

जेएम फायनान्शियल फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, येस बँकेचा निव्वळ नफा तिमाही आधारावर 686.6 टक्क्यांच्या वाढीसह 405 कोटी रुपयेपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. तर PPOP आणि PAT वार्षिक आधारावर दुहेरी अंकानी वाढू शकतो. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने येस बँकेच्या शेअरवर 16 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. जेएम फायनान्शिअल फर्मने 16 रुपये लक्ष्य किंमतीसाठी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. टेक्निकल चार्ट पॅटर्ननुसार येस बँकेच्या शेअरमध्ये अल्पकालीन तेजी पाहायला मिळू शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price Today on 20 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या