25 November 2024 9:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

Multibagger Stocks | पैसा पाहिजे का? हे 5शेअर्स 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर 10 लाख रुपये परतावा देत आहेत, लिस्ट पहा

Multibagger Stock

Multibagger Stocks| शेअर बाजारात गुंतवणुकदार आपले पैसे अनेक पट वाढवण्याच्या अपेक्षेने गुंतवणूक करत असतात. अनेकदा काही शेअर्स गुंतवणुकीवर 100 पट किंवा त्याहून अधिक परतावा देतात. मात्र शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात जोखीम तर असतेच. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा पाच स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्यानी मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांना 10 हजार रुपये गुंतवणूकीवर 10 लाखांहून अधिक परतावा मिळाला आहे.

ज्योती रेजिन्स :
एकूण परतावा परतावा : 370 पट अधिक.

ज्योती रेझिन्स कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 36900 टक्के परतावा कमावून दिला आहे. एप्रिल 2013 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 4 रुपये होती. गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 1,543.10 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 370 पट अधिक कमाई केली आहे. ज्या लोकांनी या स्टॉकवर 10,000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 37 लाख रुपये झाले आहे. ज्योती रेजिन्स सिंथेटिक वुड अॅडेसिव्हच्या उत्पादन व्यवसायात गुंतलेली कंपनी आहे.

हिंदुस्थान फूड्स :
गुंतवणुकीवर परतावा : 347 पट अधिक.

हिंदुस्थान फूड्स कंपनीने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 34000 टक्के म्हणजेच 347 पट अधिक परतावा मिळवून दिला आहे. एप्रिल 2013 मध्ये या कंपनीचे शेअर्स 1.70 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 593.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 34.70 लाख रुपये झाले आहे. ही एक वैविध्यपूर्ण FMCG प्रॉडक्ट्स उत्पादन करणारी कंपनी आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत या कंपनीचे महसूल उत्पन्न 679.64 कोटी रुपये आणि निव्वळ नफा 17 कोटी रुपये होता.

केईआय इंडस्ट्रीज :
गुंतवणुकीवर परतावा: 163 पट अधिक

केईआय इंडस्ट्रीज कंपनीने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 16172 टक्के परतावा कमावून दिला आहे. एप्रिल 2013 मध्ये या कंपनीचे शेअर्स 11 रुपयांवर ट्रेड करत होते. गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,749.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 163 पट अधिक परतावा मिळवून दिला आहे. ज्या लोकांनी या स्टॉकवर 10,000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 16.30 लाख रुपये झाले आहे.

तानला प्लॅटफॉर्म :
गुंतवणुकीवर परतावा: 132 पट अधिक

Tanla Platforms कंपनीने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 13100 टक्के परतावा कमावून दिला आहे. एप्रिल 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 637.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कालावधीत शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 132 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 13.2 लाख रुपये झाले आहे. Tanla Platforms ही कंपनी क्लाउड कम्युनिकेशन सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीने 26.3 टक्के वाढीसह 116.51 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

जेबीएम ऑटो :
गुंतवणुकीवर परतावा : 130 पट अधिक

JBM Auto कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 12900 टक्के परतावा कमावून दिला आहे. एप्रिल 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स 6 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 805.45 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. या कालावधीत स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 130 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले होते, त्यांना 13 लाख रुपये परतावा मिळाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock has given amazing Return to shareholders details on 20 April 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x