28 April 2025 10:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

मोदींच्या मुखवट्यामागच्या खऱ्या चेहऱ्याची कल्पना नव्हती: बॉक्सर विजेंदर सिंग

Narendra Modi, vijender singh

नवी दिल्ली : बॉक्सर विजेंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली असून मुखवट्यामागे काय आहे याची कल्पना नव्हती असा टोला लगावला आहे. तत्पूर्वी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिलेल्या विजेंदर सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फार चांगले संबंध होते. त्यांच्या चांगल्या संबंधांचे पुरावा देणारे अनेक फोटो समाज माध्यमांवर सहज उपलब्ध आहेत. दोघांनी अनेकवेळा एकमेकांसाठी ट्विटही केलं होतं. विजेंदर सिंग यांनी पहिल्यांदा व्यवसायिक फाइट जिंकल्यानंतर मोदींनी त्याचं कौतुक केलं होतं. पण २०१९ मध्ये चित्र बदललं असून विजेंदर सिंग यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांशी खोटं बोलले असा आरोप त्यांनी केला आहे.

‘जेव्हा तुम्ही एखाद्याचं कौतुक करता तेव्हा मुखवट्यामागे काय आहे याची कल्पना नसते. भाजपासाठी २०१४ मध्ये मिळालेला विजय सर्वात मोठा होता’, असं विजेंदर सिंग यांनी सांगितलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, ’१५ ते २० लाख रुपये असेही गरिबांच्या खात्यात येतील. माझ्याकडे अजूनही तो युट्यूब व्हिडीओ आहे. ते खोटं होतं. लोकांनी आणि खासकरुन गरिबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला’.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान आपण काळा पैसा भारतात आणू, ज्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख जमा होतील असं म्हटलं होतं. नरेंद्र मोदी आपलं आश्वासन पूर्ण करु शकत नाहीत अशीही टीका त्यांनी केली आहे.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण दिल्लीमधून उमेदवारी देणं विजेंदर सिंगसाठी आश्चर्यकारक होतं. याआधी काँग्रेस या जागेसाठी १९८४ शीखविरोधी दंगलीतील आरोपी सज्जन कुमारच्या भावाला तिकीट देणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. आपण कांग्रेस पक्षाची निवड का केली यावरही विजेंदर सिंगने भाष्य केलं आहे.

माझं व्हिजन, माझे विचार, माझी विचारसरणी अगदी काँग्रेसशी मिळती जुळती आहे. त्यांच्याकडे व्हिजन, प्लॅनिगं, सुशिक्षित लोक आणि चांगले नेत आहेत. काँग्रेस नेते भविष्याबद्दल चांगल्या गोष्टींबद्दल बोलतात असं विजेंदर सिंगने सांगितलं आहे. दिल्लीत 12 मे रोजी मतदान पार पडणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या