Railway Ticket Booking | बापरे! रेल्वे तिकीट रिझर्वेशन बंद राहणार? प्रवाशांना रेल्वे तिकीट बुकिंग करता येणार नाही? रेल्वेची माहिती

Railway Ticket Booking | जर तुम्ही गाव-शहरात रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी खूप कामाची बातमी आहे. २२ आणि २३ एप्रिल रोजी रेल्वेची प्रवासी आरक्षण सेवा (पीआरएस) सुमारे साडेतीन तास विस्कळीत होणार आहे. या कालावधीत तुम्हाला ना तिकीट रद्द करता येणार आहे ना तिकीट आरक्षण करता येणार आहे. इतकेच नाही तर या कालावधीत तुम्हाला सीटचे ऑनलाइन बुकिंग, चार्टिंग, काउंटर इन्क्वायरी किंवा ईडीआय सेवांचा ही लाभ घेता येणार नाही.
रेल्वे तिकीट बुक करण्यात अडचण येणार
भारतीय रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 22-23 एप्रिल रोजी 139 वर कॉल करून तुम्हाला ट्रेनच्या (पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम) ऑपरेशनशी संबंधित कोणतीही माहिती मिळू शकणार नाही. या दरम्यान रेल्वे स्थानकावर जाऊन तुम्ही कोणतेही तिकीट बुक करू शकत नाही किंवा रद्द ही करू शकत नाही. ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात बराच वेळ लागणार आहे.
आरक्षण-रद्द करणेही शक्य होणार नाही
भारतीय रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डेटाबेस कॉम्प्रेशन अॅक्टिव्हिटी अद्ययावत केल्यामुळे पीआरएस प्रणाली (पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम) तात्पुरती विस्कळीत होणार आहे. यामुळे ठराविक विभागातील पीआरएसच्या सर्व सेवा 22 एप्रिल रोजी रात्री 11.45 ते 23 एप्रिल 2023 रोजी पहाटे 3.15 वाजेपर्यंत बंद राहतील. या 3.30 तासांमध्ये लोकांना चौकशी सेवा, आरक्षण, रद्दीकरण, इंटरनेट बुकिंग आणि ईडीआर सेवेचा लाभ घेता येणार नाही.
पीआरएस प्रणाली म्हणजे काय?
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक रेल्वे स्थानकावर ऑफलाइन तिकीट बुकिंगसाठी पीआरएस प्रणाली आहे. या प्रणालीच्या (पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम) मदतीने रेल्वे तिकीट प्रणाली काम करते. तसेच रेल्वे स्थानकांवर आरक्षण, चौकशी यंत्रणा, रद्दीकरण अशी कामे केली जातात. कामाचा ताण वाढल्याने त्यावर प्रचंड कामाचा ताण पडतो, त्यामुळे वेळोवेळी अद्ययावतीकरण करत राहणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच्या अपडेटनंतर ही सेवा जलद होते आणि बुकिंगचा वेग वाढतो. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी हेही स्पष्ट केले की याचा फटका महाराष्ट्रातील पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीमला बसणार नाही. या सेवेचा सर्वाधिक फटका बसेल तो दिल्ली रेल्वे स्थानकातील पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीमला. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना विशेष काळजीचं कारण नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Railway Ticket Booking system shut down check details on 22 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON