23 November 2024 8:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Tata Investment Corporation Share Price Today | टाटा ग्रुपचा छुपा शेअर, गुंतवणूकदारांना 4200 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?

Tata Investment Corporation Share Price

Tata Investment Corporation Share Price Today | ‘टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ या टाटा समूहाच्या नॉन बैंकिंग वित्तीय कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षांत ‘टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन’ कंपनीचे शेअर्स 4200 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. (Tata Investment Corporation Limited)

या NBFC कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 2,162 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2886.50 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1218 रुपये होती.

1 लाखावर दिला 43 लाख परतावा :
25 एप्रिल 2003 रोजी ‘टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन’ कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्समध्ये 50.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टाटा ग्रुपच्या या NBFC कंपनीचे शेअर्स 21 एप्रिल 2023 रोजी 2162 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअर्सनी मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 4200 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 25 एप्रिल 2003 रोजी ‘टाटा इन्व्हेस्टमेंट कॉपरिशन’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 42.95 लाख रुपये झाले असते.

3 वर्षात दिला 240 टक्के परतावा :
‘टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 240 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 638.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 21 एप्रिल 2023 रोजी ‘टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन’ कंपनीचे शेअर्स 2162 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका वर्षात ‘टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन’ कंपनीचे शेअर्स 46 टक्के वधारले आहेत. मागील एका महिन्यात ‘टाटा इन्व्हेस्टमेंट कॉपोरेशन’ कंपनीचे शेअर्स सुमारे 11 टक्के मजबूत झाले आहेत.

कंपनीची आर्थिक कामगिरी :
डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीने 14.85 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर डिसेंबर 2022 च्या तिमाहीत ‘टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन’ कंपनीने 24.71 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने डिसेंबर तिमाहीत 14.85 कोटी रुपये निव्वळ नफा नोंदवला आहे. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने महसूल 95.92 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, आणि त्यात कंपनीने 86.19 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Investment Corporation Share Price Today on 22 April 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x