23 November 2024 5:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

'त्या' अहवालात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला 60-65 जागा तर शिंदे गटाला 7-8 जागा? त्यानंतर अजित पवारांसंबधीत घडामोडींना जोर

Maharashtra Assembly Election 2023

BIG BREAKING | राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. मात्र, भाजपने मिशन २०२४ चं रणशिंग फुंकलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शहा अनेक राज्यांचे दौरे करत आहेत. कोणत्याही परिस्थिती भाजपला पुन्हा एकदा २०२४ मध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींना विराजमान करायचं आहे. त्यासाठी, आत्तापासूनच भाजपचं स्थानिक पातळीवर कामकाज सुरू झालं आहे. त्याच अनुषंगाने भाजपकडून चाचपणी आणि पक्षमेळावे सुरू आहेत.

मात्र, भाजपचे वरिष्ठ नेते आणि सरचिटणीस विनोद तावडे यांच्या एका अहवालातून महाराष्ट्रासाठी भाजपला धोक्याची घंटा दर्शविण्यात आलीय. विशेष म्हणजे या अहवालातील केवळ लोकसभा निवडणुकीसंदर्भात बातम्या झाल्या होत्या. पण आता भाजपच्या वरिष्ठ नेत्याने नाव न फोडण्याच्या अटीवर धक्कादायक माहिती दिली आहे. तेच कारण अचानक अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या वृत्तांना कारणीभूत ठरलं अशी माहिती मिळाली आहे. अजित पवार यांच्या संबंधित वृत्त आणि गौतम अदाणींच्या पवारांसोबतच्या भेटी-गाठी त्याच रिपोर्टमधील बाहेर न आलेल्या आकडेवारी संबंधित असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

तर समोर आलेल्या माहितीनुसार 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला नुकसान होणार असल्याचं या अहवालात म्हटलं असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात 42 खासदार युतीचे निवडून आले. पण, 2024 मध्ये भाजप-युतीचे १५ ते १६ पेक्षा अधिक खासदार निवडून येणार नसल्याचं या अहवालात आहे, असंही काही वृत्तांमध्ये म्हटलं गेलं.

भाजपच्या तावडे समितीच्या अंतर्गत सर्व्हेनुसार राज्यातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी तब्बल ३३ जागा महाविकास आघाडीला मिळतील. २०२४ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपला महाराष्ट्र गमावणे परवडणारे नाही, असे सूत्रांनी सांगितले. मात्र या अहवालात आगामी विधानसभा निवडणुकीबाबत माहितीने भाजपाची झोप उडाली आहे. कारण याच अहवालानुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ ६०-६५ जागा मिळतील तर शिंदे गटाला फक्त ७-८ जागा मिळतील असा अहवाल केंद्राला दिला. त्यामुळे मोदींची खुर्ची देखील ढळमळीत झाली आहे याचा अंदाज भाजपाला आल्यानंतर तिसरा भिडू म्हणजे अजित पवार यांच्यासोबत गुप्त गाठीभेटी झाल्या माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे.

विशेष म्हणजे शिवसेना फुटीचा संतापजनक प्रकार लोकांनी खुल्या डोळ्याने आणि ऑन रेकॉर्ड पाहिल्याने भाजप तसेच शिंदे गटाबद्दल मतदारांमध्ये प्रचंड रोष असून तो मत पेटीतून उमटू शकतो. भाजपच्या याच अंतर्गत अहवालानुसार उद्धव ठाकरेंच्या प्रति लोकांमध्ये प्रचंड सहानुभूती निर्माण झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. शिवसेना फुटीमुळे केवळ हिंदू मतदारच नव्हे तर अल्पसंख्यांक आणि बहुजन समाजातील मतदार देखील उद्धव ठाकरेंसोबत मोठ्या प्रमाणात जाईल असं या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळेच, ध्यानी-मणी नसताना अचानक अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या बातम्या का प्रसिद्ध झाल्या याचा थेट संबंध त्याच अहवालातील भाजपाला मिळणाऱ्या ६०-६५ जागा आणि शिंदे गटाला फक्त ७-८ जागा याविषयाशी जोडला जातोय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Assembly Election 2023 BJP Tawade Samiti Report secret facts check details on 23 April 2023.

हॅशटॅग्स

#Maharashtra Assembly Election 2023(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x