22 November 2024 10:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Yes Bank Share Price Today | गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली, येस बँकेने जाहीर केले तिमाही निकाल, शेअरच्या किंमतीवर काय परिणाम होणार?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price Today | मागील काही आठवड्यापासून शेअर बाजारातील गुंतवणुकदार ‘येस बँक’ या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या आर्थिक तिमाही निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. येस बँकेने आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत येस बँकेचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 45 टक्क्यांच्या घसरणीसह 367.46 कोटी रुपयेवरून 202.43 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मात्र तिमाही आधारावर येस बँकेच्या महसुलात 293 टक्क्यांची नोंदवली गेली आहे. (Yes Bank Limited)

मजबूत महसूल कमाई :
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत येस बँकेने 7,298.51 कोटी रुपये महसूल संकलित केले आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाही कालावधीत येस बँकेने 5,829.22 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षात येस बँकेच्या स्टँडअलोन मालमत्ता वाढली होती. येस बँकेच्या एकूण मालमत्तेचे मुख्य 3,54,786.13 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील एका वर्षापूर्वी येस बँकेचे मालमत्ता मूल्य 3,18,220.23 कोटी रुपये होते, ज्यात 11.49 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 1.88 टक्क्यांच्या घसरणीसह 16.22 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 2.78 टक्के घसरणीसह 15.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. येस बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 12.26 रुपये होती. तर 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 24.75 रुपये होती. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 46,640 कोटी रुपये आहे.

येस बँकेच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 25.08 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. येस बँकेच्या शेअरने मागील तीन महिन्यांच्या कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 18.08 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील एका महिन्यात येस बँकेचे स्टॉकमध्ये 4.65 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price Today on 24 April 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(194)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x