23 November 2024 6:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Navin Fluorine International Share Price Today | 10,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर 10 लाख परतावा देणारा शेअर, फायदा पाहा

Navin Fluorine International Share Price

Navin Fluorine International Share Price Today | ‘नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल’ या केमिकल कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. ‘नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल’ या कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षांत लोकांना 10,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात ‘नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल’ कंपनीच्या शेअरची किंमत 47 रुपयेवरून वाढून 4700 रुपयेवर पोहचली आहे. ‘नवीन फ्लोरिन’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4,847.35 रुपये होती. (Navin Fluorine International Limited)

10,000 वर दिला 10 लाख परतावा : 26 एप्रिल 2013 रोजी ‘नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स 46.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 21 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4729.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.67 टक्के घसरणीसह 4,701.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘नवीन फ्लोरिन’ कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 17.89 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 26 एप्रिल 2013 रोजी नवीन फ्लोरिन कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10.08 लाख रुपये झाले असते.

31000 टक्के परतावा :
‘नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 20 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 31117 टक्के नफा कमावून दिला आहे. 3 ऑक्टोबर 2003 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 24 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4701 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही 3 ऑक्टोबर 2003 रोजी नवीन फ्लोरिन कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.13 कोटी रुपये झाले असते.

नवीन फ्लोरिन इंटरनॅशनलबद्दल थोडक्यात :
‘नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल’ ही केमिकल कंपनी भारतात विशेष फ्लोरोकेमिकल्स बनवणारी आघाडीची कंपनी मानली जाते. ही कंपनी benzotrifluoride डेरिव्हेटिव्हज, fluorobenzene derivatives, 3 aliphatic fluoro compounds बनवण्याचे काम करते.

मार्च 2023 तिमाहीच्या नवीनतम शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 28.81 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत. आणि सार्वजनिक गुंतवणूकदारांनी 71.19 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. डिसेंबर 2022 तिमाहीत या कंपनीने 423.50 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, त्यात कंपनीने 81.58 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Navin Fluorine International Share Price Today on 24 April 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x