22 November 2024 5:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Cyient Share Price Today | या कंपनीचे शेअर्स तेजीत, कंपनी लवकरच लाभांश वाटप करणार, तपशील जाणून घ्या

Cyient Share Price

Cyient Share Price Today | नुकताच संपलेल्या 2022-23 या चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर आयटी कंपनी ‘सायएंट लिमिटेड’ च्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 1170 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आणि ट्रेडिंग सेशन दरम्यान शेअरची किंमत 1193 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. (Cyient Limited)

उत्कृष्ट तिमाही निकालानंतर ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. नुकताच या आयटी कंपनीने आपल्या शेअर धारकांना 320 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.02 टक्के वाढीसह 1,171.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

1360 रुपये लक्ष किंमत :
मोतीलाल ओसवाल यांनी ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीच्या शेअरवर 1360 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 1,091 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. सध्या किमतीच्या तुलनेत तज्ञांनी दिलेली लक्ष्य किंमत 25 टक्क्यांनी अधिक आहे. ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीने 5 रुपये दर्शनी मूल्याच्या आधारे आपल्या शेअर धारकांना प्रती शेअर 320 टक्के म्हणजे 16 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.

तिमाही निकाल तपशील :
‘सायएंट लिमिटेड’ कंपनीच्या उत्पन्नात तिमाही आधारावर 6.45 टक्के आणि वार्षिक आधारावर 42.36 टक्के वाढ झाली असून कंपनीचे एकत्रित एकूण उत्पन्न 1752 कोटी रुपयेवर पोहचले आहे. या कालावधीत कंपनीने 163.20 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तर वार्षिक आधारावर कंपनीच्या विक्रीत 25.25 टक्के वाढ झाली असून कंपनीने 597.20 कोटी रुपये सेल्स नोंदवला आहे.

लाभांश तपशील : ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 साठी तिसरा लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने पहिला लाभांश मे 2022 मध्ये प्रति शेअर 14 रुपये आणि दुसरा लाभांश ऑक्टोबर 2022 मध्ये 10 रुपये प्रति शेअर दिला होता. या तिमाहीत कंपनीने 16 रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीने एकूण 40 रुपयेचा लाभांश गुंतवणुकदारांना दिला आहे. कंपनीने अंतिम लाभांशची रेकॉर्ड डेट आणि पेमेंट डेट जाहीर केली नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Cyient Share Price Today on 24 April 2023.

 

हॅशटॅग्स

#Cyient Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x