6 November 2024 8:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

AU Small Finance Bank Share Price Today | एका निर्णयामुळे या खाजगी बँकेचे शेअर्स तेजीत आले, तज्ञ म्हणतात खरेदी करा, टार्गेट प्राईस?

AU Small Finance Bank Share Price

AU Small Finance Bank Share Price Today | खाजगी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ च्या शेअरमध्ये मागील एका महिन्यापासून तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी दिनांक 20 एप्रिल रोजी देखील या कंपनीचे शेअर्स सुडत वेगात धावत होते. RBI ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ ला फॉरेन डीलर परवान्यासाठी अधिकृत केल्याने शेअरची किंमत मजबूत वाढीसह ट्रेड करत होती. (AU Small Finance Bank Limited)

या मोठ्या बिझनेस अपडेटनंतर अनेक ब्रोकरेज हाऊसेसने ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात हा स्टॉक 20-25 टक्के वाढू शकतो, असे तज्ञांना वाटते. सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के घसरणीसह 664.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
जागतिक ब्रोकरेज फर्म ‘मॉर्गन स्टॅनली’ ने ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ च्या स्टॉकवी ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन शेअरची लक्ष किंमत 835 रुपये निश्चित केली आहे. 19 एप्रिल 2023 रोजी ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ स्टॉक 679 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. सिटी फर्मने 740 रुपये लक्ष्य किंमत निश्चित करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 732.90 रुपये होती.

मॉर्गन स्टॅनले फर्मच्या तज्ञांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, रिझर्व्ह बँकेने ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ ला परदेशी डीलर म्हणून परवाना जारी केल्याने बँकेला मजबूत फायदा होणार आहे. अल्पावधीत किंवा मध्यम मुदतीत बँकेला फी च्या माध्यमातून मजबूत कमाई होऊ शकते. ब्रोकरेज फर्मचा असा विश्वास आहे की, ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’चा इक्विटीवरील परतावा आर्थिक वर्ष 2025 पर्यंत 17 टक्के पर्यंत जाऊ शकतो. 2023 मध्ये या बँकिंग स्टॉकचा ROE 15 टक्के आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या गुंतवणूकदारांनी दीर्घ मुदतीत अप्रतिम नफा कमावला आहे. मागील 5 वर्षात ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ च्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 107 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 4 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. 20 एप्रिल 2018 रोजी ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ चे शेअर्स 326.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ चे एकूण बाजार भांडवल 45,161.98 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | AU Small Finance Bank Share Price Today on 24 April 2023.

हॅशटॅग्स

#AU Small Finance Bank Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x