14 November 2024 4:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | पुन्हा तेजीने कमाई होणार, रिलायन्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RELIANCE NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC EPF Contribution Limit | पगारदारांसाठी आनंदाची बातमी; आता आधीपेक्षा जास्त बचत होईल, EPF ची अधिक रक्कम मिळणार Property Knowledge | मालमत्ता खरेदी करणे पडू शकते महागात, वेळीच सावध व्हा, 'या' गोष्टींमुळे सोपे होईल प्रॉपर्टीचे काम Income Tax Notice | क्रेडिट कार्ड वापरता, क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी बातमी, थेट इन्कम टॅक्सची नोटीस येईल दारी - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजी वाढणार - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा रॉकेट होणार, रेटिंग अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IDEA
x

Mukesh Ambani's Right Hand | रिलायन्स ग्रुपमध्येच नोकरीला पण पगार मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अधिक, कोण आहे ही व्यक्ती?

Mukesh Ambani and Nikhil Meswani

Mukesh Ambani’s Right Hand | रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये निखिल मेसवानी मुकेश अंबानी यांच्यापेक्षा जास्त पगार घेतात. 2021-22 या आर्थिक वर्षात निखिल मेसवानी यांना 24 कोटी रुपये पगार मिळाला होता. तर मुकेश अंबानी यांना या आर्थिक वर्षात १५ कोटी रुपये पगार मिळाला. निखिल मेसवानी हे मुकेश अंबानी यांच्या मुंबई इंडियन्स या क्रिकेट फ्रँचायझीचे काम सांभाळतात. याशिवाय ते रिलायन्स इंडस्ट्रीजमध्येही अनेक महत्त्वाच्या पदांवर आहेत.

निखिल मेसवानी यांचे मोठे बंधू हितल मेसवानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कार्यकारी संचालक आहेत. निखिल मेसवानी यांचे वडील रसिक लाल मेसवानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक संचालक होते. मेसवानी कुटुंब हे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वाढीच्या कथेतील एक महत्त्वाचा भाग मानले जाते. मुकेश अंबानी यांचाही या दोन्ही भावांवर खूप विश्वास आहे.

निखिल मेसवानी यांनी प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पण लवकरच ते रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी पदावर पोहोचले. कंपनीच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका मानली जाते. जामनगर रिफायनरीबरोबरच समूहाच्या किरकोळ आणि दूरसंचार व्यवसायातही ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

जानेवारी महिन्यात मध्य प्रदेशमध्ये झालेल्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये निखिल मेसवानी यांनी कंपनीच्या भविष्यातील योजनेविषयीही भाषण केले होते. या सर्व गोष्टींचा अंदाज मेसवानी यांच्या भूमिकेवरून लावता येतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mukesh Ambani and Nikhil Meswani Salary check details on 25 April 2023.

हॅशटॅग्स

#Nikhil Meswani(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x