24 April 2025 11:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा पेनी स्टॉक पुन्हा तेजीत; 5 वर्षात 2,028% परतावा दिला, टार्गेट अपडेट जाणून घ्या - NSE: TTML Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये तुफान तेजीचे संकेत, सुस्तावलेला स्टॉक पैसा वसूल करणार - NSE: TATATECH Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये 3000 रुपये जमा केल्यास 5 वर्षांत किती मिळतील? अशी ठरवा बचत रक्कम SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल HDFC Mutual Fund | पगारदार महिना केवळ 1,000 रुपये SIP वर मिळवत आहेत 2 कोटी रुपये परतावा, बिनधास्त पैसा कमवा Horoscope Today | 24 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

रत्नागिरी रिफायनरी | कोकणी माणसाच्या आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा धोक्यात, प्रकल्पावरून शिंदे समर्थक कोकणी जनतेच्या विरोधात

Ratnagiri Refinery Project

Ratnagiri Refinery Project Protest | कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी एका बाजूला सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे तर दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून प्रकल्पाला विरोध केला जात आहे. या प्रकरणी आतापर्यंत काही जणांना अटकही करण्यात आली आहे. सोमवारी रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना राजापूरमध्ये अटक करण्यात आली. त्यांसोबत आणखी दोन सहकाऱ्यांनाही अटक केली असून तिघांनाही रत्नागिरीत ठेवण्यात आले आहे.

रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलन सुरू आहे. प्रशासनाकडून इशारा दिल्यानंतरही स्थानिकांकडून आंदोलन सुरूच ठेण्यात आलं आहे. अनेक आंदोलक सर्वेक्षणाच्या जागेवर ठिय्या मांडून होते. राजापूर तालुक्यातील तहसिलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनीही स्थानिकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पण प्रकल्प हद्दपार होणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांची आहे.

गावांची जमीन या प्रकल्पासाठी देण्यात येणार
बारसू सोलगाव आणि पश्चिम भागातील काही गावांची जमीन या प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. रिफायनरीसाठी जवळपास चौदा हजार एकर जागा आणि बंदरासाठी जवळपास 2414 एकर जागा देण्यात येणार आहे. सर्वेक्षणाबाबत स्थानिकांशी चर्चा करण्यासाठी महसूल अधिकारी, राजापूरचे तहसीलदार, प्रांतअधिकारी बारसू गावात दाखल झाले आहेत.

भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात क्रूड ऑईल रिफाईन करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उदयोग’ प्रस्तावित आहे. महाराष्ट्र शासन या प्रकल्पासाठी आग्रही असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे सदर प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर, नाटे या परिसरात नियोजित आहे. आधी हा प्रकल्प नाणारमध्ये प्रस्तावित होता. मात्र नाणार परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करण्यास ग्रामस्थांकडून विरोध केला गेला. त्यानंतर आता शासनाकडून बारसू-सोलगाव परिसरामध्ये त्याची उभारणी करण्याची चाचपणी सुरू झाली आहे.

प्रचंड वायू आणि जल प्रदूषणाने आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा धोक्यात
कोकणाला निसर्गाने भरभरुन दिलं आहे. आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा ही कोकणची संपत्ती आहे. मात्र रिफायनरीमुळे ही संपत्ती धोक्यात येईल, अशी स्थानिकांची भूमिका आहे. याशिवाय कोकणातील रहिवाशांचा मासेमारी हा प्रमुख रोजगार आहे. मात्र रिफायनरीमुळे समुद्रात गरम पाणी आणि आणखी काही घटक सोडले जातील यामुळे मासेमारीवर परिणाम होईल, जैवविविधतेवर धोका निर्माण होईल आणि याचा कोकणाच्या अर्थचक्रावर परिणाम होईल. शिवाय या प्रकल्पामुळे आपल्या जमिनी धोक्यात येतील, अशा काही प्रमुख कारणांमुळे कोकणात नाणार पाठोपाठ बारसू, सोलगावमध्येही रिफायनरी प्रकल्पाचा विरोध होत आहे.

शिंदे समर्थक कोकणी जनतेच्या विरोधात
स्वतःला कोकणाचे नेते समजणारे आणि शिंदे समर्थक उद्योगमंत्री उदय सामंत मात्र यांचं कोकणी जनतेच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. उदय सामंत यांनी म्हटले की काही लोक समर्थन करत आहे. त्याबद्दलही बोलले पाहिजे. ज्या ठिकाणी शंभर बोर मारायचे होते. त्यातले 50 बोरची लोकांनी परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की शंभर टक्के विरोध आहे. जो विरोध आहे तो गैरसमाजातून आहे.

ज्यांचा गैरसमज झाला आहे. त्यांचा गैरसमज काढला जाईल. आजच प्रकल्प होणार नाही. कंपनीला वाटेल की आम्ही या ठिकाणी आता प्रकल्प करू शकतो. त्यावेळेस प्रकल्पाची सुरुवात होणार आहे. राजकीय वातावरण कुठेतरी तयार करायचा प्रयत्न केला जातो आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ratnagiri Refinery Project Protest controversy check details on 25 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ratnagiri Refinery Project(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या