23 November 2024 5:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Vertoz Advertising Share Price | हा शेअर वेगाने वाढतोय, गुंतवणूकदारांचे पैसे अल्पावधीत 300% वाढले, डिटेल्स तपासून घ्या

Vertoz Advertising Share Price

Vertoz Advertising Share Price | ‘व्हर्टोझ अॅडव्हर्टायझिंग’ या अॅड-टेक कंपनीच्या शेअरने मागील सहा महिन्यात कमालीची कामगिरी केली आहे. एवढेच नाही तर, शेअरची किंमत एका महिन्यात 20 टक्के पेक्षा जास्त वाढली आहे. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील 10 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 315 टक्के मजबूत झाले आहेत. (Vertoz Advertising Limited)

तर मार्च 2023 तिमाहीतील कंपनीच्या निव्वळ नफ्यात 140 टक्क्यांची वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीने 3.10 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तिमाही आधारावर कंपनीच्या नफ्यात 28 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 28 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 5.77 टक्के घसरणीसह 245.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

‘व्हर्टोझ अॅडव्हर्टायझिंग’ ही कंपनी जाहिरात क्षेत्रात व्यापार करणारी कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहक व्यवसायांना त्यांचा व्यवसाय डिजिटल पद्धतीने वाढविण्यात मदत करते आणि त्या संबंधित सेवा प्रदान करते. मार्च तिमाहीत या कंपनीने 3.10 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता जो मागील वर्षाच्या तुलनेत 140 टक्के वाढला आहे.

त्याच वेळी कंपनीचा परिचालन महसूल वार्षिक आधारावर 243 टक्के आणि तिमाही आधारावर 60 टक्के वाढीसह 34.32 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. कंपनीचा ऑपरेटिंग नफा वार्षिक 9.63 टक्क्यांच्या वाढीसह 9.63 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. 2022-23 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 81 टक्के वाढीसह 11.04 कोटी रुपये नोंदवला गेला होता. त्याच कालावधीत कंपनीचे परिचालन महसूल दुप्पट झाले असून 82.81 कोटी रुपयेवर पोहचले आहे.

28 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 5.77 टक्के घसरणीसह 245.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. प्रॉफिट बुकींगमुळे शेअरची किंमत घसरली असावी असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक 260 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 22 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 67.35 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किमतीवर ट्रेड करत होते.

अवघ्या 10 महिन्यांत शेअरची किंमत 315 टक्क्यांनी वाढून 28 एप्रिल 2023 रोजी 279.50 रुपयेवर पोहोचली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 149 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vertoz Advertising Share Price today on 29 April 2023.

हॅशटॅग्स

Vertoz Advertising Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x